एमआडीसी कार्यालयाच्या स्थलांतरास स्थगिती

0
धुळे / धुळे येथे असणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास कार्यालय जळगाव येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय आज मुंबई येथे जळगावचे महसुलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या आयोजित बैठकीत रद्द करण्यात आला.
धुळे येथील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आठवड्यातून दोन दिवस जळगाव येथे जावून जळगाव एमआयडीसीचे कामकाज पाहतील असाही निर्णय घेण्यात आला.

सदर निर्णयाचे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांनी स्वागत केले असून धुळे कार्यालय स्थलांतरण न करण्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

धुळे येथे कार्यरत असणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास कार्यालय जळगाव येथे थलांतर करण्याचा निर्णय आज मंत्रालयात महसुलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार होता.

यासाठी उद्योग विभागाशी संबंधीत सर्व अधिकारी या बैठकीसाठी आमंत्रीत केले होते. मंत्रालयात ही बैठक झाली. धुळे जिल्ह्यातून सदर कार्यालय स्थलांतरास उद्योजक व लोकप्रतिनिधींचा तिव्र आक्षेप असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी मंत्री महोदयांना दिली.

तत्पूर्वी माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी विद्यमान उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचेशी चर्चा करून आपल्या मंत्रालयाशी संबंधित विषयात परस्पर निर्णय होत असल्याची तक्रार केली.

प्रा.पाटील यांनी ना.चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून धुळ्याचे प्रादेशिक कार्यालय स्थलांतर करणे कसे चुकीचे आहे हे पटवून दिले.

यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यानेच गांभीर्य लक्षात घेता सदर कार्यालय जळगाव येथे स्थलांतरीत न करता प्रादेशिक अधिकारी जळगाव येथे आठवड्यातून दोन दिवस व महिन्यातून किमान आठ दिवस जावून काम पाहतील असे निर्देश दिलेत.

 

LEAVE A REPLY

*