गुंड गुड्ड्या हत्याप्रकरणात आ. अनिल गोटेंकडून कदमबांडे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न – राष्ट्रवादी

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-शहरात गुंड गुड्ड्या खून प्रकरणाबाबत अनिल गोटे यांनी चिखलफेक करणे सुरु केले आहे. पोलिसांवर दबाव आणण्याच्या दृष्टिने पोलिसांना फोन करणे, तपासी अंमलदारास फोन करणे, आपल्यासह इतर पोलिस अधिकारी यांच्या भेटी घेणे, त्यांच्यावर राजकीय दबाव आणणे तसेच मुंबई क्राईम ब्रँचकडून चौकशीची मागणी केलेली होती.
आता तुमची प्रकरणे बाहेर काढीन, अशा धमक्या देखील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्याची माहिती चर्चिली जात आहे. तसेच राजवर्धन कदमबांडे यांचे नाव चौकशीत घ्यावे, असा प्रयत्न आ.अनिल गोटे करीत आहेत, अशा आशयाचे पत्रक राष्ट्रवादीतर्फे पोलिस अधिक्षक एम.रामकुमार यांना देण्यात आले.

पत्रकात म्हटले आहे की, आ.गोटे हे पोलिसांवर दबाव आणून पोलिसांना राजकीय नेते व राजवर्धन कदमबांडे यांचे नाव चौकशीत घुसविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत वेळीच चौकशी करण्यात यावी तसेच आ.गोटेंच्या पोलिस अधिकारी, कर्मचारी व गुड्ड्या खून प्रकरणातील तपासी अंमलदार यांच्याशी झालेल्या संभाषणाचे सिडीआर मागविण्यात यावे. योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी केली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्यासह महानगर अध्यक्ष मनोज मोरे, महापौर सौ.कल्पना महाले, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, म्हाडाचे सभापती किरण शिंदे, जि.प.सभापती किरण पाटील, उपमहापौर उमेर अन्सारी, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा ज्योती पावरा, महिला बालकल्याण सभापती इंदुताई वाघ, नगरसेविका यमुनाबाई जाधव, शरद वराडे, माधुरी अजळकर, अरशद फरीद शेख, सौ.नलिनी वाडीले, आनंदा सूर्यवंशी, राजेंद्र माळी, चंद्रकला जाधव, आर.आर.माळी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*