गांधी हॉस्पिटलमध्ये मेडिकेटेड ऑक्सिजन युनिट

0
शिरपूर । दि.16 । प्रतिनिधी-महाराष्ट्रात अनेकदा उत्कृष्ट व कौतुकाचा विषय ठरलेल्या शिरपूर वरवाडे नगर परिषद संचलित इंदिरा गांधी मेमोरीअल हॉस्पीटल मार्फत रुग्णसेवेला प्राधान्य दिली जात असल्याची बाब आनंददायी असून माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने या हॉस्पिटलमध्ये दररोज 20 सिलींडर्स मेडिकेटेड ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता असलेल्या 30 लाख रुपये किंमतीचे सेंट्रल ऑक्सिजन जनरेटर सिस्टीम गेल्या वर्षभरापासून कार्यान्वित करण्यात आले आहे.
यामुळे गरजू व अतिदक्षता कक्षातील रुग्णांना 95 ते 99 टक्के शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होतो. या प्रकल्पामुळे रुग्णांना सेवा देण्याचे मोठे काम सुरु आहे.

इतरत्र ऑक्सिजन अभावी रुग्णांचे झालेले हाल किंवा मृत्यूच्या घटना पाहिल्या तर शिरपूर न.पा.ने हॉस्पिटलसाठी सुरु केलेले सेंट्रल ऑक्सिजन युनिट ही मोठी समाधानकारक बाब आहे.

इंदिरा गांधी हॉस्प्टिलमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एन.आय.सी.यू.) व बाल अतिदक्षता विभाग (पी.आय.सी.यू.), प्रसुति विभाग, ऑपरेशन थिएटर्स, आय.सी.यू. विभाग, डायलेसिस विभाग असून या सर्व विभागांना 24 तास आवश्यकतेनुसार अनेकदा ऑक्सिजनची गरज भासते.

यापूर्वी रुग्णांसाठी धुळे येथून ऑक्सिजन सिलींडर्स आणून ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था केली जात होती. परंतु, ही महत्वाची गरज लक्षात घेवून नगर परिषदेने ऑगस्ट 2012 मध्ये एरॉक्स टेक्नॉलॉजीज् औरंगाबाद यांच्याकडून दररोज 11 सिलींडर्स ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता असलेली अमेरिकन तंत्रज्ञानाचे सेंट्रल ऑक्सिजन जनरेटर सिस्टीम खरेदी करुन कार्यान्वित केली.

नवजात शिशू व बालरुग्ण विभागात तसेच आय.सी.यू. विभागात बर्‍याच रुग्णांना व्हेंटीलेटर (कृत्रिम श्वसन यंत्र) सुरु असते. यासाठी जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज लक्षात घेवून हॉस्पिटलमध्ये डिसेंबर 2016 पासून दररोज 20 सिलींडर्स ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता असलेल्या 30 लाख रुपये किंमतीचे सेंट्रल ऑक्सिजन जनरेटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे गरजू व अतिदक्षता कक्षातील रुग्णांना 95 ते 99 टक्के शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

इंदिरा गांधी हॉस्पिटलची 1914 मध्ये स्थापना झालेल्या या हॉस्पिटलचे जून 2003 मध्ये माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नूतनीकरण करण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील व बाहेरील अनेक रुग्णांना माफक दरात धुळे, नाशिक, मुंबई येथील दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.

यासाठी लागणा-या अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करुन विविध विभाग सुरु करण्यात आले आहेत. हॉस्पिटलचे बांधकाम देखील आधुनिक पद्धतीने करण्यात आले असून 100 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याचे रुपांतर झाले आहे. दररोज पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर्सची नेमणूक करण्यात आली आहे.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे अनेक क्षेत्रातील कार्य अतिशय उत्तम असून रुग्णसेवेसाठी सुरु केलेल्या इंदिरा गांधी हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा देण्यासाठी माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी खूप परिश्रमपूर्वक प्रयत्न केले आहेत.

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी प्रत्येक क्षेत्रात तत्परतेने कामे व्हावीत यासाठी प्रयत्न चालविले आहेत. आता शहरात व हॉस्पिटलमध्ये नियमितपणे भेटी देवून नागरिकांना स्वच्छ व पारदर्शीपणे अतिशय चांगली सेवा देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असून सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*