54 लाखांची बनावट दारु जप्त

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-मुंबई-आग्रा महामार्गावर हाडाखेड ता. शिरपूरनजीक मध्यप्रदेश निर्मित 53 लाख 84 हजार रुपये किंमतीची बनावट दारु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरुन दारुची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे आज दि. 12 ऑगस्ट रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर हाडाखेड नजीक पथकाने सापळा रचला त्यावेळी महामार्गावरुन एमपी 09 एचएफ 7787 क्रमांकाचे वाहन संशयास्पदरित्या जातांना आढळले.

त्यामुळे पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेश निर्मित व विक्री करण्यासाठी बिअरचे खोके आढळून आले. वाहनातून किंगफिशर बिअरचे 900 बॉक्स आणि माऊंट बिअरचे 150 बॉक्स आणि गाडी असा 53 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई निरीक्षक एम.एन.कावळे, डी.एम.चकोर, व्ही.बी.पवार, दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, एल.एम.धनगर, जवान शांतीलाल देवरे, आर.एन. सोनार, ए.व्ही.भडागे, प्रशांत बोरसे, अमोल धनगर, के.एम.गोसावी, जी.एस.पाटील, जी.बी.पाटील, कपिल ठाकूर, वाहन चालक विजय नाहिदे यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

*