विकासकामांमुळेच भाजपात प्रवेश

0
दोंडाईचा । दि.12 । प्रतिनिधी-शिंदखेडा शहरात गेल्या 30 वर्षापासुन दरवर्षी 8 महिने भीषण पाणीटंचाई जाणवत होती, शहरातील तहसिल कार्यालयाची इमारत मोडकळीस आली होती, पोलिस स्टेशन आणि तहसिलची इमारत ब्रिटीशकालीन इमारतीत होते, शहरातील आदिवासी आणि दलित मुलांना वसतीगृहाची सोय नव्हती, याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिंदखेडा हे तालुक्याचे शहर असतांना याठिकाणी ग्रामपंचायत अस्तित्वात होती, पंरतू ही सर्व कामे ना.जयकुमार रावल यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, ही सर्व कामे मार्गी लागल्यामुळे शिंदखेडा शहराच्या सौदर्यांत भर पडली आहे, नगरपंचायतीमुळे विकासाचा निधी देखील मोठया प्रमाणावर येतो त्यामुळे नागरी सुविधा पुरविणे नगरपंचायतीला सोपे होत आहे, वास्तविक आम्ही मागील काळात काँग्रेस पक्षाचे काम करीत होतो, तरीदेखील पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांनी आमच्या शिंदखेडा शहरासाठी भरगोस निधी दिला त्यांच्या या विकासाच्या धडाक्याला प्रभावित होवूनच आम्ही सर्व नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया शिंदखेडयाचे गटनेते अनिल वानखेडे यांनी दिली आहे.

काल शिंदखेडा शहराचे कॉग्रेसचे दिग्गज नेते अनिल वानखेडे यांनी आपल्या 10 नगरसेवकांसह मुंबईतील प्रदेश कार्यालयात वित्त व वन मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष ना.सुधीर मुनगंटीवार आणि रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे आगामी शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र बदलणार असून त्यांच्या रूपाने भाजपाला नगरपंचायतीत शिरकाव करण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे,

प्रवेश केल्यानंतर श्री.वानखेडे म्हणाले की, शिंदखेडा शहराचा सर्वात प्रमुख प्रश्न हा पाणीपुरवठा योजनेचा होता, अनेक वेळा पाणीप्रश्नावर राजकारण रंगले, श्रेयवाद रंगला पंरतू राज्यात भाजपाची सत्ता ना.जयकुमार रावल यांनी शिंदखेडा शहराला नविन पाणीपुरवठा योजनेसाठी 21 कोटीचा निधी मंजूर करून आणून आमचा जिव्हाळयाचा प्रश्न सोडवून गेल्या दिवाळीला शिंदखेडेकरांना ना.जयकुमार रावल यांनी भेट दिली, एवढेच नव्हे तर शिंदखेडा शहराच्या विकासासाठी त्यांच्या डोक्यात अनेक चांगल्या कल्पना आहेत, पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी मला 5 ते 6 वेळा मुंबईला बोलाविले त्यानिमीत्ताने त्यांचे विचार आणि विकासाचा ध्यास पाहून मी प्रभावित झालो म्हणूनच भाजपात प्रवेश केल्याचे गटनेते अनिल वानखेडे यांनी आपल्या प्रवेशावर बोलतांना नमुद केले.

 

LEAVE A REPLY

*