सत्यशोधकतर्फे ‘भिक मांगो’ आंदोलन

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-ओबीसींच्या न्याय हक्कासाठी व ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती माघार घेणार्‍या शासनाला धडा शिकविण्यासाठी सत्यशोधक जनआंदोलनातर्फे शहरातील जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भिक मागो आंदोलन करण्यात आले.
मंडल आयोगातील तरतूदीनुसार ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. सदर शिष्यवृत्ती राज्य सरकार व केंद्र सरकार एकत्रीतपणे देते परंतू गेल्या दोन-तीन वर्षापासून केंद्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद केली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्यातच गेल्या चार महिन्यापासून वेबसाईड बंद असल्याने गेल्या दोन-तीन वर्षाच्या शिष्यवृत्तीबाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

परिणामी अनेक विद्यार्थ्यांना संपुर्ण शुल्क अदा केल्याशिवाय महाविद्यालय कागदपत्र देत नाही. ज्या ओबीसी विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे.

घटनात्मक तरतुदीमुळे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंडल आयोग गठीत करण्यात आला. त्यानुसार गावकुसच्या आतील मागासवर्गीय असलेल्या कुणबी, तेली, माळी, कोळी, सोनार, साळी, लोहार, सुतार, न्हावी, भावसार, गवळी आदी जातीचा नोकरी व शिक्षणातील आरक्षणाचे लाभ मिळायला लागले. मात्र, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी अंमलात येवू नयेत म्हणून प्रयत्न झाले. तसेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचाही प्रश्न मागे पडला.

एका बाजूला ओबीसी शिष्यवृत्तीतील हिस्सा अदा करायचा नाही आणि दुसर्‍या बाजूला मात्र देशातील बड्या उद्योगपतींना कर्ज देखील माफ करायचे, अशी दुटप्पी भूमिका केंद्र शासन घेत आहे. 350 कोटी रुपयांचे अनुदान अदा न केल्यामुळे ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याण विभागात फेर्‍या मारत आहेत.

ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याच्या शासनाच्या धोरणाचा सत्यशोधक जनआंदोलन निषेध करण्यात आला आहे.

ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागात वारंवार फेर्‍या मारतो परंतू त्याला तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळतात. ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याचा डाव शासनाचा आहे.

तो हाणून पाडण्यासाठी सत्यशोधक जनआंदोलनातर्फे भिक मागो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शहरातील समाजकल्याण कार्यालयापासून सुरुवात झाली.

सत्यशोधक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन करण्यात आले.

एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनावर कॉ. नरेंद्र चौधरी, कॉ. राहूल वाघ, वसीम अत्तार, नितीन पाटील, मनोज नगराळे, राकेश अहिरे, सागर पाटील, ज्ञानेश्वर माळी, निखिल गवळी, सागर पाखळ, प्रतिक बागूल, भूषण पाटील, सिध्दार्थ बागूल, शिवाजी वाघ, भूषण ब्राम्हणे, मनोहर कांबळे, महेंद्र शिंदे, संदीप खैरनार, पुरुषोत्तम केदार, शत्रुघ्न शिंदे, धोंडीराम मोरे, योगिता चौधरी, योगिता पाटील, रोहिणी वाढे, बुध्दभूषण भामरे, रोशण खैरनार, कॉ. सिध्दार्थ जगदेव, रोशनी बोरसे, दीक्षा अहिरे, जयश्री पाटील, योगेश शिरसाठ, सिध्दार्थ भामरे, गौरवी पवार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*