खंडणीची मागणी तिघांविरुद्ध गुन्हा

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-50 लाखांची खंडणी दिली नाही तर चाकूने भोसकून जीवे ठार करु अशी धमकी दिल्या प्रकरणी तीन जणांविरुध्द पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील नकाणे रोडवरील आदर्श कॉलनीत राहणारे महेंद्र देवीदास विसपुते यांची शैक्षणिक संस्था आहे.

या संस्थेची बदनामी करुन अशी धमकी देवून 50 लाखांची खंडणी संजय हिरामण पवार, विजय हिरामण पवार, भूषण अहिरे यांनी मागीतली.

जर पैसे दिले नाहीत तर चाकूने मारुन टाकू तसेच अ‍ॅट्रॉसीटी दाखल करुन असे अडवून सांगितले व ठार मारण्याची धमकी दिली.

ही घटना दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता नकाणे रोडवरील पुलाजवळ घडली. याबाबत महेंद्र विसपुते यांनी पश्चम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भादंवि 387, 504,506, 34 प्रमाणे तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहनावरुन पडल्याने मयत- मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या पिकअप वाहनातून काल दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता शिरपूर गावालगत विश्वास केश्या पावरा (वय28) हा पडल्याने मयत झाला.

याबाबत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात सुरेश केश्या पावरा यांनी फिर्याद दिली. त्यावरुन वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्मचारी बेपत्ता- नगाव येथे एका पेट्रोल पंपावर काम करणारा गणेश राजेंद्र माळी (वय20) रा. सोनगीर हा दि. 2 ऑगस्टपासून बेपत्ता झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*