धुळ्यातील प्रेमीयुगुलाची आळंदीत आत्महत्त्या

0
आळंदी । दि.11 । वृत्तसंस्था-धुळे जिल्ह्यातील एका प्रेमीयुगुलाने आळंदी येथे शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आज दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार समोर आला. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पाटील (वय 35 रा. डागुर्ण ता.सिंदखेडा जिल्हा धुळे) आणि रीना गिरी गोसावी (वय वर्ष 25 रा. धुळे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

हे दोघेही धुळ्यात राहणार होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दोघेही घरातून बेपत्ता होते. आज दुपारी त्यांचे मृतदेह इंद्रायणी नदीच्याकाठी आढळून आले.

यावेळी त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली आढळून आली. दरम्यान, मृत रीना हिचे लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही काळापासून तिचे राहुलशी प्रेमसंबंध होते.

आत्महत्येपूर्वी रीनाने आपल्या घरच्यांना फोन केला होता. त्यावेळी आपण आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले होते, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*