बहुजन रयत परिषदेची संवाद यात्रा आज धुळ्यात

0
धुळे । दि.11 । प्रतिनिधी-धुळे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समाज प्रबोधनासाठी मसंवाद यात्राम सुरू आहे.
प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेली समाज प्रबोधन संवाद यात्रा उद्या दि. 12 रोजी धुळ्यात दाखल होणार आहे.
यावेळी माजी आमदार राजीव आवळे हे देखील उपस्थित राहणार आहेत. 1 ऑगस्टपासून प्रारंभ झालेल्या या संवाद यात्रेचा सध्या उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू असून त्याचा समारोप आज धुळ्यात केला जाणार आहे.

अहमदनगर, नाशिक, जळगाव तसचं नंदुरबार याठिकाणांहून ही यात्रा आज धुळ्यात येऊन पोहचतेय. मातंग समाजातील नागरिक हे विविध हक्कांपासून वंचित राहत असून त्यांना शासनपातळीवरील सर्व योजनांचा तसेच त्यांच्या हक्कांचा लाभ घेता यावा याविषयी संवाद यात्रेतून समाज प्रबोधन घडवण्याचं काम बहुजन रयत परिषदेकडून केलं जातं आहे.

त्याचबरोबर समाजातील राष्ट्रपुरुषांच्या शिकवणीवर युवा पिढीचं लक्ष वेधले जावे व यातूनच देशकार्य घडावे हा देखील महत्वाचा उद्देश या संवाद यात्रेचा आहे.

त्यामुळे यात समाजातील महिला, पुरुषांनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाज विधायक कार्याला हातभार लावावा असे आवाहन बहुजन रयत परिषदेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र वाकळे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*