आर.सी.पटेल अ‍ॅम्बिशन कॅरम स्पर्धेत खेळाडूंनी केले उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन

0
शिरपूर । प्रतिनिधी-शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्व शाळांमधील सहावी ते दहावी पर्यंतच्या 14 व 17 वर्षेखालील मुलामुलींच्या कॅरम स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या असून एकूण चार गटात 252 खेळाडूंनी सहभाग घेतला.
आर.सी.पटेल संकुलाच्या मेन बिल्डींग येथे संस्थेच्या सर्व शाळांचे एकत्रित सामने घेण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटनसंस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, कमलकिशोर भंडारी, मुख्य वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक व्ही.पी.दीक्षित, प्रा.विनय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दरवर्षी माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर मोठया प्रमाणात गरुडझेप घेतल्याचे चित्र कौतुकास्पद आहे.

14 वर्षेखालील मुलांच्या स्पर्धेत शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालयाचे प्रथम राहुल पावरा, द्वितीय निसर्ग पावरा, तृतीय कपिल पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय प्राप्त केला.

14 वर्षेखालील शिरपूर येथील एच.आर.पटेल कन्या मराठी माध्यमिक विद्यालयाची देवियानी बोरसे प्रथम, वैष्णवी पाटील द्वितीय, निताली मगरे तृतीय क्रमांक संपादन करुन यश संपादन केले.

17 वर्षेखालील मुलांच्या स्पर्धेत शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालयाचा लोकेश राजकुळे प्रथम, जुगल देवरे द्वितीय, होळनांथे येथील आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालयाचा वरुण चव्हाण तृतीय क्रमांकाने हे विजयी झाले.

17 वर्षेखालील शिरपूर येथील एच.आर.पटेल कन्या मराठी माध्यमिक विद्यालयाची पुजा धाकड प्रथम, खर्दे शाळेची हर्षदा पटेल द्वितीय, होळनांथे शाळेची मोक्षिता जैन तृतीय क्रमांकाने हे यशस्वी झाले.

या सर्व यशस्वी खेळाडूंना दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या बक्षिस वितरण सोहळयात संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, मुख्य वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक व्ही.पी.दीक्षित, प्र.प्राचार्य डॉ.राहुल सनेर, प्रा.विनय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणार्‍या विजेते खेळाडूंना अनुक्रमे सुवर्ण पदक, रजत पदक व कांस्य पदक देवून त्यांचे कौतुक करण्यात आले.

कॅरम प्रशिक्षक साजिद सैयद, मोहसीन कुरेशी यांच्यासह दुष्यंत पाटील, आर.यू.चौधरी, एस.एन.पाटील, राकेश बोरसे, भूषण चव्हाण, श्रीमती एस.एस.जोशी, पी.बी.धायबर, मनोज पाटील, सचिन सिसोदिया, आर.एस.शिरसाठ, विजय सिसोदे, सर्व क्रीडा शिक्षक, सर्व प्रशिक्षक, खेळाडू यांनी परीश्रम घेतले.

पंच म्हणून लोकेश राजकुळे, निखील वळवी, चेतन देवरे, पवन बारी, शुभम कुलकर्णी, शुभम माळी, योगेश पाटील, गौरव कदम यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

*