राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी दावा केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील आ.अनिल गोटे व भिसे यांच्यातील संभाषण

भिसे- भिसे बोलतोय…हॅलो
गोटे- मुंबई क्राईम ब्रँन्चला तपास दिलाय.
भिसे- काय सर?
गोटे- मुंबई क्राईम ब्रॅन्चला तपास दिलाय.
भिसे- कुठला आपला काय, त्याचा?
गोटे- हो!
भिसे- बरं, कुणी दिला, तुम्ही दिलाय काय
गोटे- मी कशाला ु ु ु देवू यार!
भिसे- मग काय मला कळालं नाही, तुम्ही सांगितले ते.
गोटे- मुख्यमंत्र्यांनी आदेश केले आज.
भिसे- आज केलेत?
गोटे- हां…!
भिसे- मुंबई क्राईम ब्रॅन्चला त्याचा तपास दिला. म्हणजे याचा मांगलिकचा किडनॅपिंग वगैरे व ओ.के.आहे.
मुंबई क्राईम ब्रॅन्चकडे दिला काय?
गोटे- हूँ
भिसे- म्हणजे त्यांनी आसचं केलं की काय वेगळ्या
दिशेने झाले?
गोटे- माझा अर्ज होता ना, त्यात व..
भिसे- तुुमचा अर्ज होता ना, तुम्ही करणार होतात.
भिसे- हां. मुंबई क्राईम ब्रॅन्चला आदेश दिला काय?
व्हेरी गुड. थॅक्यु सर थॅक्यु.
गोटे- हूँ.
भिसे- थॅक्यू सर, थॅक्यू थॅक्यू…
गोटे- हूँ
भिसे- तुम्ही कुठे आहांत सर, नागपूरला येवू का नको?
साहेब काय करु?
गोटे- येवून जा.
भिसे- मी येतोय.
गोटे- ये ना.
भिसे- नाही मी येतो आहे.
गोटे- येवून जा ना, मोपेलवार सारखे फोन करतोय मला.
भिसे- बरं, मग काय करायचंय, कॉल घ्या ना तुम्ही. सांगाल तसं करु आपण पुढे साहेब.
गोटे- काय मी कॉल घेवू. मला काय घेणे तुमच्याशी.
भिसे- हूँ ऽऽ हूँ…
भिसे- अहो घेणं नसतं तर साहेब तुम्ही एवढे केले असते काय! मला सांगा तुम्ही.
गोटे- मी एक गोष्ट कबूल केली ती करतो.
भिसे- मी तेच म्हणतो घेणं आहे म्हणून तर. तुम्ही वडीलधारे आहात आमच्यासाठी. काय मुलांकडून तसं चुकतो, थोडसं तुम्हीच कान पिळायचे. बाकी कोण पिळणार आहे सांगा मला.
गोटे- ुुु ुुु मध्ये साले हजारो शेकडो लाखों रुपये घालवले असतील, काय?
भिसे- हूँ ऽऽ हूँ
गोटे- स्वतःच्या जीवापेक्षा त्याला पैसे महत्वाचे काय?
भिसे- हूँ.
भिसे- ते करत होतो, ते काय झाले. ते करत होतो पण अ‍ॅरेंजमेंटला उशिर लागला होता. एवढाच विषय झाला होता. बाकी काय नाही. मी तुुम्हाला बोलत होतो. पण थोडसं ते बाहेर असल्याने अडचण झाली होती. त्यावेळी ते अ‍ॅव्हलेबल होते. ते घेवून आला होता. त्यांनी तुम्हाला फोन केला काय झालं मला माहित नाही. माझं तुम्ही फोन घेणे बंद झालं. मी म्हटलं झाल काय तुम्हाला. कॉन्टॅक्ट तुम्ही फोन उचलल्याशिवाय करु शकत नव्हतो, अस झालं. तुमच्याशी बोलणं झाल्यावर विषय हा झाला. मी येतो सर नागपूरला. फोन करतो मी तुम्हाला.
गोटे- उद्या ये.
भिसे- उद्याला का?
गोटे- उद्या दिवसभरामध्ये त्या ऑर्डरची कॉपी घे तुमच्याकड.े त्या मुर्खाला दाखवा काय आहे ते.
भिसे- मुर्खच आहे ते काय? जाऊन द्या ना साहेब आहे ते. आता माझ्याशी इतका भांडतो, काय सांगू तुम्हाला? पण त्याच्या बायका पोरं, आई वडिल…आपण बाकी काय नाही. साहेब त्याचे बिचार्‍याचे अक्षरशः रडतात, तुम्हाला भेटले तर तुमचे पाय सोडायचे नाहीत, असे आहेत ते लई गरीब लोक आहेत.
गोटे- काय लायकी नाही.
भिसे- ते आहेच. त्याबद्दल दुमत नाही. मी सहमत याविषयी तुमच्याशी, पण कसे आहे. थोडसं त्याच्या लहान मुलांकडे बघतो. लहान मुलांकडे बघून चालले आहे. काम आहे तुमच काय? फक्त सपोर्ट काढू नका. मागून एव्हढ करा, शेवटपर्यंत तग धरुन ठेवा. पुढे जे काम करायच ते तुमच्या मार्गदर्शनाखाली करु.
गोटे- मला काही करायच नको. मला परमेश्वराने भरपूर दिलं आहे, काय…काय.
भिसे- बरोबर
गोटे- दुसर्‍यांची भिक मागतात.त्यांच्याकडून काय
अपेक्षा करणार?
भिसे – येतो उद्या सकाळची फ्लाईट बघतो.
गोटे- हे बघ येतांना नवीन करंन्सी आण, जुनी नको आणू. इथे कोणी बाप घेत नाही. इथे हात लावत नाही, ठिक ओके ठिक.
गोटे- बरं का?
भिसे- लक्षात आलं
गोटे- झालं सगळं व्यवस्थित मार्गी लागेल.
भिसे- प्रॉपर मुख्यमंत्र्यांनीही आदेशच काढले म्हणाले ते आता.
गोटे- मग काय वाटते. घे ना उद्या कॉपी, घे ना त्याची.
भिसे- ठिक आहे ना साहेब. ठिक- येस
गोटे- तुम्ही कराल चूप
भिसे- मी बोललो आहे का कधी. तुम्ही माझे नेते आहात. मी कार्यकर्ता आहे पक्षाचा. अस काय करता. असं तुमच्या पुढे शब्दाची बाउंड्री क्रॉस केली का कधी. तुम्ही सांगाल आता तो मुर्ख आहे. त्याला द्या सोडून. मी केलं का कधी, सांगा तुम्ही.
गोटे- मला काही घेणं – देणं नाही कुणाशी.
भिसे- येतो, उद्या येतो साहेब उद्या येतो की.
गोटे- उद्या ये आणि घेवून ये आणि घेवून जा तुझा कागद.
क्राईम ब्रॅन्चमध्ये कोण आहे बघ.
भिसे- मुंबई क्राईम बँन्चला दिले नां.
गोटे- मुंबई क्राईम ब्रॅचला थोडा वेळ लागेल. मुंबई क्राईम ब्रॅच माझे इकडचेच आहे. मी करतो ते बरोबर!
भिसे- ओके सर. ओके ठिक सर.
गोटे- काय.
भिसे- ओ.के.
गोटे- तो फोन करतो सारखे तो, मोपलवार फोन करतो सारखे.
भिसे- फोन करतोस सारखे?
गोटे- त्याचे दाखवतो तर मला किती फोन करतो.
भिसे- मी उद्या येतो साहेब, फोनवर नको जास्त बोलायला. तुम्हाला समोर येऊनच बोलतो काय ते.
गोटे- मी त्याच्या बापाला घाबरत नाही.
भिसे- हूँ…हूँ
भिसे- नाही, नाही, पण माझे फोन हे होतात. परत
आपले संभाषण.
गोटे- नाही मग काय मी बोलतोय. तु थोडा बोलतोय.
भिसे- हूँ …हूँ चालेल ना. नो प्रॉब्लेम उद्या येतो.
गोटे- मी कोणाला घाबरत नाही. मला काय घेणं देणं नाही.
भिसे- आलोच.
गोटे- नो प्रॉब्लेम मी कोणाला घाबरत नाही.
भिसे- नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं.
गोटे- हूँ…
भिसे- मग लक्ष्यवेधी जी करणार होते, ती आता नाही
करणार काय?
गोटे- करणार आहे.
भिसे- बरयं ठिक आहे.
गोटे- नका करु म्हटले तर नाही करणार.
भिसे- बरोबर बरोबर एस. सर.
गोटे- काय
भिसे- ओ.के.
गोटे- काय
भिसे- होऽऽ हो साहेब, सकाळी तुम्हाला निघायच्या आधी फोन करेल.
गोटे- मी हाउसमध्ये असेल.
भिसे- ठिक आहे फोन करून येतो.
भिसे- तिथे कुठे असेल कसे कळेल मला.
गोटे- केळकरचा फोन नंबर आहे ना तुमच्याकडे.
भिसे- हाच नंबर का!
गोटे- अहो केळकरांचा फोन नंबर दिला आहे नां!
भिसे- केळकर, केळकर, केळकरांचा नंबर सांगा तर सांगा बघतो. आहे काय? नाही तर मला मेसेज आला तर बरे होईल ना, फोन आला तर सेव्ह नव्हता केला, होता फोनमध्ये निघून गेला असेल तर, प्रॉब्लेम होईल, मला एक मेसेज टाकून द्या ना प्लीज.
गोटे- बरं टाकतो.
भिसे- ओ.के. साहेब
गोटे- बरे.
भिसे- ठिक आहे साहेब बाय….
गोटे- बरं!

 

LEAVE A REPLY

*