पटेल महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

0
शिरपूर । दि.11 । प्रतिनिधी-शिरपूर येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ण्ड डेव्हलपमेंट परिसंस्थेत इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे एम.बी.एम. विभागातील माजी विद्यार्थी श्री.किशोर कोळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी भुषविले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थी श्री. किशोर कोळी यांना रोप देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रा. मनोज पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. जयपाल राजपूत, प्रा. मनोज पाटील यांनी निमेशन तंत्राद्वारे करुन दिला.

यानंतर कार्यक्रमात एम.बी.एम.चे विविध पदावर कार्यरत असलेले यशस्वी विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सादरीकरण करण्यात आले. यात त्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेच्या मोलमंत्र एम.एम.एस. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना देण्यात आला.

सदर कार्यक्रमांतर्गत बक्षीस वितरण समारंभही करण्यात आला. सदर बक्षीसेही परिसंस्थेत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान पटकाविणा-या तसेच प्रथम व द्वितीय सत्रात सर्वोत्कृष्ट हजेरी व टक्केवारीत विशेष वाढ त्याचप्रमाणे विविध क्टीव्हीटींमधला सहभाग व परिसंस्थेतील वागणुक अश्या विविध विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व माजी विद्यार्थी श्री. किशोर कोळी ळजड डेव्हलपर, कॅनव्हील टेक्नोलॉजी, पुणे यांनी आय.टी. क्षेत्रातील त्यांचा अनुभव, नविन तंत्रज्ञान ,आय.एम.आर.डी. परिसंस्थेच्या त्यांचा यशात असलेला मोलाचा वाटा व एम.एम.एस. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.

यानंतर परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी प्रा. मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभागप्रमुख प्रा. मनोज पटेल, प्रा. तुषार पटेल हे उपस्थीत होते. सुत्रसंचालन प्रा. जयपाल राजपूत, आभार प्रा. डी.एम. मराठे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. मनोज पाटील, प्रा. जयपाल राजपूत, प्रा. डी.एम.मराठे, प्रा. अर्चना जडे, वैशाली गोरले, श्री. डी.यु. चौधरी, विशाल माहेश्वरी, सौ. कविता पाटील, सौ. निलिमा पाटील, भारती भावसार, धिरज शेटे, दिपक बोरसे, किशोर सोनवणे, सचिन नवले, दिपक दोरीक यांचे सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

*