भाजपातर्फे शिंदखेडा येथे कर्जमाफी अर्जाचे वाटप

0

दोंडाईचा । दि.11 । प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, सन्मान योजना 2017 ही देशातील सर्वात मोठी कर्ज माफी योजनेचा सर्व शेतक़र्‍यांना लाभ व्हावा म्हणून शिंदखेडा तालुका भाजपच्या वतीने प्रत्येक गावात जाऊन कर्जमाफीच्या अर्जाचे वाटप करण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ती सर्व माहिती यात नमूद करण्यात आली असून शेतकऱयांना यातून सुविधा मिळावी आणि कर्जमाफी पासून कुणीही वंचित राहू नये म्हणून पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम शिंदखेडा मतदारसंघात राबविला जात आहे.

शिंदखेडा मतदारसंघात सर्व गटामध्ये हा उपक्रम राबविला जात आहे पहिल्या दिवशी बाम्हणे व चिमठाणे जिल्हा परिषद गटातील गावामध्ये हा उपक्रम राबविला गेला यावेळी पंचायत समिती सदस्य जिजाबाराव सोनवणे, दरबरसिंग गिरासे सह विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. त्या- त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्याकडे अर्ज सुपूर्द करून अर्ज कसा भरावा याबाबत जि.प.सदस्य कामराज निकम रामकृष्ण मोरे, यांनी मार्गदर्शन केले.

यामुळे प्रत्येक गावातील शेतकर्‍यांना फार्म भरून ऑनलाईन कर्ज माफीचा फार्म भरणे सोपे होईल. या मुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

 

LEAVE A REPLY

*