गुड्ड्या हत्त्याकांड तपासाला गती

0
धुळे । दि.10 । प्रतिनिधी-कुख्यात गुंड शेख रफियोद्दीन शेख शफियोद्दीन उर्फ गुड्ड्या हत्याकांड प्रकरणी तपास अधिकारी हिम्मतराव जाधव यांनी जाबजबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या प्रकरणी इतर काही पुरावा गोळा करण्यास देखील पोलिस यंत्रणेने भर दिला आहे.
गुंड गुड्ड्याची दि. 18 जुलै रोजी शहरातील पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊसमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपींसह त्यांना आश्रय देणार्‍या 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

त्यापैकी 15 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्यांची रवानगी नाशिक व औरंगाबाद कारागृहात करण्यात आली आहे.

तर विक्की उर्फ विक्रम शाम गोयर याला दि. 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

विक्कीची चौकशी पोलिस करीत आहेत. या प्रकरणी शाम गोयर व बडा पापा उर्फ विजय शाम गोयर हे दोघे जण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तपासी अधिकारी हिम्मतराव जाधव हे दि. 9 ऑगस्टपासून साक्षीदारांचे जाबजबाब घेत आहेत. तसेच इतर पुरावा गोळा करण्यावरही भर देण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. या समितीत आठ अधिकार्‍यांचा समावेश असून या समितीने देखील तपासाला सुरुवात केली आहे.

 

LEAVE A REPLY

*