अनिल वानखेडे यांचा आज भाजपात प्रवेश

0
प्रा.प्रदीप दीक्षित,शिंदखेडा । दि.10-शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे यांचा उद्या दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश होत आहे.
यावेळी पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात होणार्‍या या सोहळ्याप्रसंगी वानखेडे यांच्यासह शिंदखेडा शहर व तालुक्यातील त्यांचे समर्थक भाजपात दाखल होणार आहेत.

अनिल वानखेडे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. शिंदखेडा शहराचे सरपंचपद त्यांनी भूषविले असून सध्या शिंदखेडा नगरपंचायतीचे गटप्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून श्री.वानखेडे हे काँग्रेसमध्ये होते. मात्र, आता त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या विकासा संदर्भात भावी योजना पूर्णत्वास जाव्यात म्हणून पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.

त्यामुळे भविष्यात शहराचा आणखी विकास होवू शकतो, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री.वानखेडे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदखेड्यातील मोठा गट भाजपावासी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*