स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी सेनानींचे योगदान – माजी खा.बापू चौरे

0
पिंपळनेर । दि.9 । वार्ताहर-आम्ही वनवासी नसून आदिवासी आहोत. स्वातंत्र्यासाठी अनेक आदिवासी स्वातंत्र्य सेनांनींच योगदान आहे. संपूर्ण जगभर 9 ऑगसटला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन माजी खा.बापू चौरे यांनी केले. पिंपळनेर येथिल मार्केट कमेटीच्या प्रांगणात आदिवासी गौरवदिन साजरा करतांना अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन उत्तमराव मालचे यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यसेनानी बिरसामुंडा, तंट्या भिल, ख्वाज्या नाईक, पुंजा भिल व विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून माजी खा.बापू चौरे, जि.प.सदस्य योगेश चौधरी, डॉ.तुळशिराम गावीत, टिकाराम बहिरम, धीरज अहिरे, धर्मेंद्र बोरसे, डोंगर बागुल, डॉ.रजन गावीत, डॉ.जितेश चौरे, डॉ.नितीन सूर्यवंशी, डॉ.राहुल गावीत, ईश्वर ठाकरे, रविंद्र मालुसरे, अनिल गायकवाउ, रविंद्र अहिरे, हेमंत अहिरे, अजय चौधरी, सिताराम बागुल, वामन अहिरे, आण्णा महाराज,, बाळू पवार, परशराम मालचे, सुरज सोनवणे, दिपक माळीच, मुन्ना गोपाळदास, छोटू पवार, रमेश सूर्यवंशी, कैलास देसाई, विश्वास बागुल, देविदास बागुल, गणपत चौरे, रमेश ठाकरे, रमेश गांगुर्डे, धुडकू भारुड, चेतन खंबाईत, तुकाराम बहिरम, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री कालीका देवी मंदिरा पासून कै.हरीभाऊ चौरे आश्रम शाळेचे, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था संचलित अनु.प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या तसेच मुलामुलींचे होस्टेलचे विद्यार्थ्यांनी व एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषदेचे कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या तालावर ख्वाजानाईक, तंट्या भिल व एकलव्यच्या सजिव देखाव्यासह मिरवणूक काढली.

कृषी उत्पन्न बाजार समितीत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी, पावरी, पावरा, झुबकी नृत्य सादर केले. यावेळी बोलताना बापू चौरे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून विविध आरक्षणातून आदिवासीसह इतर समाजाला विकासात आणले. अ‍ॅक्ट्रासिटी कायदा केला.

डॉ.तुळशिराम गावीत म्हणाले की, आदिवासी तरुणांनी न्युनगंड न ठेवता स्पर्धेच्या युगात सहभाग घ्यावा. डॉ.जितेश चौरे यांनी सांगितले की, आदिवासी समाजात आजही अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या दूर कराव्यात. भिल्ल, कोकणी, मावची, असा भेदभाव करू नये.

यावेळी उमेश माळी यांनी आदविासी क्रांतीकारकांचे जीवनकार्य मांडले, तर माजी सभापती टिकाराम बहिरम यांनी 9 ऑगष्टला आदिवासी गौरव दिनी आश्रमशाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली.

तसेच डॉ.रंजन गावीत, धीरज आहिरे, श्रीमती प्रतिभा चौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. धर्मेंद्र बोरसे यांनी आदिवासी गीत सादर केले.

आदिवासी उपयोजनेअंतर्गत सर्व ग्रा.पं. परिसरातील गौण खनिज कर वसुली अधिकारी ग्रामपंचायतीला मिळावेत., पेसा कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे. भारतीय संविधानाची अनुसुचित पाच-सहा आदिवासी प्रदेशांना लागू करावी, असी मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रास्ताविक राजेंद्र बहिरम यांनी केले. सूत्रसंचलन तुकाराम बहिरम यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*