धुळे । दि.10 । प्रतिनिधी-मुंबईत बुधवारी पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. आम्ही केलेल्या आवाहनाला धुळे जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मोर्चासाठी जिल्ह्यातून लाखो समाज बांधव सहभागी झाले होते.जिल्ह्याने मोर्चात शिस्तीचे दर्शन घडविले आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला आवाज बुलंद केला, अशी माहिती राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी दिली.

या मोर्चामुळे मराठा समाजाची ताकद सरकारला समजली आहे. मागण्या पुर्ण झाल्या नाही तर मराठ्यांचा हा आक्रोश दिल्लीपर्यंत जाईल, असेही ते म्हणाले.

मोरे पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धुळे जिल्ह्यातून लाखो समाज बांधव सहभागी झाले होते. भगवे झेंडे, टोप्या घालून मोर्चात समाज बांधवांनी सहभाग नोंदविला.

मोर्चात धुळ्यातून मनोज मोरे, संजय वाल्हे, राजीव बोरसे, बाळू आगलावे, डॉ.संजय पाटील, योगेश थोरात, समाधान शेलार, हेमंत भडक, भूषण पाटील, भरत सोनवणे, धनंजय मोरे, सुयोग मोरे, अनिल पवार, सनी मोरे आदींसह अन्य समाज बांधव सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*