दोंडाईचा । प्रतिनिधी-विद्यार्थ्यांनो शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणानेच माणूस घडतो. शिक्षणास अनन्यसाधारण महत्व आहे. देणेघेणे महत्वाचे नसून मदतीचा सदुपयोग व्हावा. देण्याची भावना निर्माण व्हावी.
शिक्षकांच्या शिक्षेशिवाय अभ्यासाची जाणीव होत नाही. शिक्षणानेच मोठ्या पदापर्यंत पोहचता येते. पैशाने नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांने शिकले पाहीजे, असे प्रतिपादन स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल यांनी येथे केले.

येथील दादासाहेब रावल हायस्कूलला सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त 450 विद्यार्थ्यांंना गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमात सरकारसाहेब रावल अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष के.एम.अग्रवाल, लायन्स क्लबचे अध्यक्ष किशोर जैन, रोटरी क्लब अध्यक्ष अनिष शहा, स्वो.वि.संस्था सचिव सी.एन.राजपूत, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, आयोजक प्राचार्य एस.एम.पाटोळे, नगरसेवक निखिल राजपूत, बांधकाम सभापती संजय मराठे, नरेंद्र कोळी, सुफियान तडवी, खलील बागवान, रामेश्वर इंदानी, जैन सोशल ग्रुपचे रितेश कवाड, डॉ.अनिल धनगर, दोंडाइचा आगारप्रमुख अर्चना देवरे, चोईथ कुकरेजा, दिनेश वोरा आदि उपस्थित होते.

किशोर जैन म्हणाले की, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी मदत करणे हत्वाचे आहे. 1 एप्रिल ते 30 जूनदरम्यान गरजू विद्यार्थ्यांनी काम करुण स्वत:च्या पैशाने शालेय साहित्य घ्यावे. रामेश्वर इंदानी यांनीही मनोगत व्यक्त केले .
प्रास्ताविक आयोजक प्रा.एस.एम.पाटोळे, सूत्रसंचलन आर.आय.गिरासे, शेख यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*