नाविण्यपूर्ण योजनांनी अभियान यशस्वी करा – दहिते

0
धुळे । दि.9 । प्रतिनिधी-केंद्र शासनाच्या ‘खुले में शौच से आझादी’ व राज्य शासनाच्या संकल्प स्वच्छतेचा …स्वच्छ महाराष्ट्राचा हे दोन्ही विशेष अभियान यशस्वी होण्यासाठी जनमानसात तळमळ निर्माण व्हायला हवी.
त्यासाठी यंत्रणेने परिश्रम घ्यायला हवेत. आपल्याकडील नवनविन कल्पना राबवून अभियान यशस्वी करा. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. शिवाजीराव दहिते यांनी येथे दिले.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत हे अभियान जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या शुभारंभासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते होते.

व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गंगाथरण डी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे उपस्थित होते.

दहिते म्हणाले, स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करित असतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अभियानाच्या यशस्वितेसाठी अधिकारी व पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय राखणे अत्यंत आवश्यक असल्याने सांगून त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

सभापती श्री. गर्दे म्हणाले, किर्तनकार हे समाजप्रबोधनाचे चांगले माध्यम आहे. स्वच्छतेच्या चळवळीत त्याचा वापर व्हायला हवा. विवाह सोहळयात डिजे वर हजारो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा नववधूसाठी शौचालयाची व्यवस्था करुन तिची होणारी कुचंबणा रोखली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी धुळयाचे गटविकास अधिकारी सी.के.माळी, शिरपूरचे गटविकास अधिकारी भरत कोसोदे, शिंदखेडयाचे गटविकास अधिकारी सुरेश शिवदे व साक्रीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी विशेष अभियान काळात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.काही नविन संकल्पना मांडल्या.

प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी शालेय उपक्रमांची माहिती दिली. सर्व शिक्षा अभियानाचे समन्वयक पी.झेड.रणदिवे यांनी अभियान काळात विदयार्थी समुहाकडून राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.

जिल्हास्तरीय कार्यशाळेत अतिरिक्त जिल्हाआरोग्यधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. आर.व्ही.पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संजय पढयार, उपअभियंता श्री. एन.डी. पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ज्योती पाटील, जिल्हयातील सर्व पंचायत विस्तार अधिकारी, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समुह समन्वयक यांची उपस्थिती होती.

पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल सोनवणे यांनी पॉवर पाँईट
प्रेझेंटेंशनच्या माध्यमातून प्रास्ताविक केले. पाणी गुणवत्ता तज्ञ श्री. विजय हेलिंगराव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा व पाणी स्वच्छता विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*