आदिवासी डोंगराचा राजा – जिल्हाधिकारी

0

धुळे । दि.9 । प्रतिनिधी-आदिवासी समाज हा कष्टकरी समाज आहे. निसर्गावर प्रेम करणारा आणि मानवता जोपासणारा आहे. समाज आपल्या मेहनतीवर उन्नती करीत असतो.

या समाजाने अनेक चळवळींमध्ये आपले मोठे योगदान दिले आहे. आपल्या कर्तृत्वातून आदिवासींनी आदर्श उभा केला असून या समाजाच्या कामगिरीची दखल घेवूनच जागतिक पातळीवर आदिवासी दिन साजरा होवू लागला.

यातून समाजाचा खर्‍या अर्थाने गौरव होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

आदिवासी विद्यार्थी संघटना व समस्त आदिवासी समाजातर्फे आयोजित जागतिक आदिवासी गौरवदिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन सूर्यवंशी होते.

यावेळी सांस्कृतिक रॅलीचे उद्घाटन एस.एस.पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून सौ.डॉ.पुष्पाताई गावीत, प्रा.मोहन पावरा, जि.प.सदस्या सौ.लिलाताई सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी आर.एन. हाडपे, डॉ.जयश्री गावीत, भगवान वळवी, किरण पाडवी, माजी जि.प. सदस्या ज्योतीताई पावरा, प्रा.डॉ.भरत कटले, राकेश जमानेकर, अनारसिंग पावरा, संजू पावरा, अशोक पाडवी, अंकुश सोनवणे, अविनाश पावरा, भटू पवार, प्रा.रतिलाल पावरा आदी मान्यवर उपस्थित होते. मोहन सुर्यवंशी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

आदिवासी समाजाच्या प्रथा-परंपरांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. समाजातील तरूणांनी शिक्षणावर भर द्यावा. त्यातून आपल्या कुटूंबाला आणि समाजाला व देशाला पुढे न्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला काढण्यात आलेल्या रॅलीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ईश्वर वळवी, आदिवासी एकता परिषदेचे उपाध्यक्ष विक्की कोकणी यांच्यासह विविध सामाजिक संघटना व विद्यार्थी, कर्मचारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साईबाबा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

 

 

 

LEAVE A REPLY

*