एस.टी बसेस वाढवा – राहुल रंधे

0
बोराडी । दि.9 । वार्ताहर-शिरपूर तालुक्यासाठी फक्त 7 एस. टी. बसेस मानव विकास मिशन अंतर्गत सेवा देत आहेत. परंतु विद्यार्थींनीची संख्या जास्त असल्यामुळे तालुक्यातील 1300 हून अधिक विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित आहेत.
त्यासंदर्भात शिरपूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल रंधे यांनी एस टी महामंडळ शिरपूर येथील सहाय्यक आगार प्रमुख श्री पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

हा सर्व विषय शिक्षण विभागाचा आहे, असे त्याच्याकडून सांगण्यात आले त्यानंतर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिरपूर श्री रणदिवे यांची भेट घेऊन शिरपूर तालुक्यातील किती विद्यार्थीनी या लाभापासून वंचित आहेत, याची माहिती घेतली.

सदर समस्यांची चर्चा जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे तसेच मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी आर.ए.पवार यांच्याशी केली.

ही समस्या जिल्ह्यातील चारही तालुक्यांची आहे असे श्री पाटील यांनी सांगितले. चारही तालुक्यात प्रत्येकी 7 बसेस दिल्या गेल्या आहेत.

या संदर्भात जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या निवेदनाची दखल घेतली. चारही तालुक्यांच्या वाढीव बसेसचे प्रस्ताव तात्काळ बनविण्यास सांगितले. खास बाब म्हणून मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंडे यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिले.

 

LEAVE A REPLY

*