राघवेंद्र भदाणे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर

0
धुळे । दि.8 । प्रतिनिधी-तालुक्यातील नगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या भदाणे परिवारातील दोघांचे नामनिर्देशन अर्ज मंजूर करण्यात आले असून राजेंद्र भदाणे यांचा अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी के.एन.पाटील यांनी नामंजूर केला.
नगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी आज दि.8 ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली.

या निवडणुकीत राघवेंद्र मनोहर भदाणे यांनी सर्वसाधारण जागेसाठी बिनकर्जदार सभासद गटात नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. ते संस्थेचे सभासद आहेत.

मात्र, संस्थेकडून आजपर्यंत कर्ज घेतलेले नाही. त्यामुळे सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी या मतदार संघात राघवेंद्र भदाणे यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी के.एन.पाटील यांनी नामंजुर केले.

 

LEAVE A REPLY

*