निजामपूरला आठ घरात चोरी

0

निजामपूर । दि.8 । वार्ताहर-साक्री तालुक्यातील निजामपूर येथील राणे व डी.एस.राणेनगर कॉलनीत चोरट्यांनी आठ घरांमध्ये घरफोडीचे रक्षाबंधन केले. यात मोठ्या प्रमाणावर दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

रक्षाबंधनानिमित्त अनेक जण बाहेर गावी गेले होते. रात्री या संधीचा गैरफायदा घेवून चोरट्यांनी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास कडीकोयंडे तोडून घरांमध्ये प्रवेश केला.

निजामपूरचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्या वलीमाबी सैय्यद, युसूफ सैय्यद यांच्या घराची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

यावेळी स्वीप्टकारची चावी, युनीकॉन मोटार सायकलची चावी घेवून कार उघडली. मोटार सायकल ढकलत दूर नेली मात्र चालू होत नसल्याने त्याच ठिकाणी सोडून चोरटे पसार झाले.

त्याचप्रमाणे राकेश मधुकर गांगुर्डे यांचा घराचा कडीकोयंडा तोडून कपाटील 16 रुपये चोरुन नेले. निवृत्त पोस्टमन रवींद्र गोविंदराव खैरनार यांचा घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

जवान महेश जगन्नाथ मोरे यांच्या घरातून चोरट्यांनी चोरी केली. माणिक श्रीराम निवृत्त पोस्ट कर्मचारी हे नासिकला गेले होते.

त्यांच्या घरातून सामानाची तोडफोड केली. संजय सीताराम पवार, रवींद्र ठाकरे यांच्या घरात असलेल्या वस्तू लंपास केल्या.

आदिवासी प्रकल्प घराचा कडीकोयंडा तोडला निजामपूर पोलिस स्टेशनचे एपीआय दिलीप खेडकर, पीएसआय कौतिक सुलवाडे, मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

LEAVE A REPLY

*