चौपदरीकरण भूसंपादन मोबदल्याचा प्रश्न सुटणार

0
धुळे  / सूरत-नागपूर महामार्ग क्र.सहाच्या चौपदरीकरणासाठी संपादीत जमीनीचा वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
त्यासाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून हा प्रश्न सोडविण्यात येईल असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शेतकरी संघर्ष समितीला सांगितले.

शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉ. भामरे यांनी तातडीने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याशी संवाद साधला.

सुरत-नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादीत झालेल्या जमिनीचा एक समान मोबदला मिळावा या मागणीसाठी 24 मार्चपासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले आहे.

या मागणीसाठी वेळोवेळी शेतकर्‍यांनी चौपदरीकरणाचे सुरु असलेले काम बंद पाडून आंदोलनेही केली आहेत.

तसेच जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठकाही घेतल्या आहेत. दि. 8 मे पासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनाची दखल घेत बुधवारी ना. डॉ. सुभाष भामरे यांनी मुकटीपासून नवापूरपर्यंतच्या बाधित शेतकर्‍यांची बैठक घेतली.

चर्चेच्या सुरुवातीला शेतकर्‍यांनी मंत्र्यांसोबत कैफियत मांडली. तसेच सर्व शेतकर्‍यांना एकसमान चौपट मोबदला देण्याची मागणी केली.

त्यानंतर ना. भामरे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी डॉ. भामरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*