कापडण्यात महादेवाला कोंडलं !

0

कापडणे । दि.7 । प्रतिनिधी-कापडण्यासह परीसरात वरुणराजाने गेल्या सव्वा महिण्यापासुन दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी शेतकरी वर्गाकडुन विविध मार्गाने साकडे घालण्यात येत आहे. यात कापडणे ग्रामस्थांनी आज(दि.7) सरळ महादेवालाच कोंडले.

पावसासाठी साकडे घालण्यासाठी येथील कपीलेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात पाणी भरले. महादेवाची पिंड पाण्याखाली गेल्यानंतर मंदिराची दारेही बंद करण्यात आली.

गेल्या सव्वा महिन्यापासुन पाऊस गायब झाल्याने येथील ग्रामस्थांवर संकट कोसळले आहे. धोंडी धोंडी पाणी दे पासुन विविध तोडगे करण्यापर्यतंचे पारंपारीक प्रयत्न होतांना दिसत आहेत.

यातच पावसाच्या सरी पडेपर्यंत महादेवाला आज असं बंदी करण्यात आलं. असं केल्याने पाऊस पडतो ही लोकांची धारणा आहे. येथील सुदर्शन चौकातील कपीलेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात पाणी भरत महादेवाच्या पिंडींला पाण्याखाली घातले गेले.

तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करुन व आरती करत मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. याठिकाणी रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

आज याठिकाणी नवल पाटील, सुनिल पाटील, रोहिदास पाटील, पांडुरंग पाटील, आशाबाई पाटील, इंदिराबाई पाटील, पुष्पाबाई पाटील, वत्सलाबाई पाटील, सुनंदाबाई पाटील, जिजाबाई पाटील, शशिकलाबाई पाटील, संगिताबाई पाटील, सुंदरबाई पाटील, उषाबाई पाटील, लिलाबाई मिस्तरी, शितलबाई पाटील, रत्नाबाई मिस्तरी, निर्मलाबाई मिस्तरी, विमलाबाई मिस्तरी, रत्नाबाई मिस्तरी, कल्पनाबाई पाटील, जया पाटील, विद्याबाई पाटील, पुष्पा पाटील, मिनाबाई पाटील, सुरेखाबाई पाटील, बेबाबाई पाटील, कमलबाई पाटील, मंगलबाई पाटील, लताबाई पाटील, हिरकणबाई पाटील, विजया पाटील, भटाबाई पाटील, बयनाबाई पाटील, सुमनबाई पाटील, वृंदाबाई पाटील, सुरेखा पाटील

 

LEAVE A REPLY

*