पविते पर्व उत्सव साजरा !

0
दत्तवायपूर । वार्ताहर-शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपुर येथे महानभुव पंथाचा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी दत्तमंदिरात व श्री कृष्ण मंदीरात पविते पर्व उत्सवात साजरा करण्यात आला.
दत्तवायपुर येथे महानभुव पंथातील भाविकांचा श्रावण महिन्यातील चावदस तिथीला म्हणजेच पौर्णिमेच्या आदल्या दिवशी दरवर्षी पविते पर्व कार्यक्रम साजरा करण्यात येतो. यंदाही हे पर्व साजरा करण्यात आला.

दत्तभाविक नारळाला या पर्वच्या अगोदर सुताच्या धागाने गुंफुन या दिवशी आलेल्या सर्व भाविकांची स्पर्श करून दत्त महाराज व श्रीकृष्ण मुर्तीला अपर्ण करतात. यावेळी परिसरातून हजारो भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात.

महानभुव पंथाने पविते पर्वची सुरूवात बीड जिल्ह्यात चक्रधर स्वामी भ्रमण कालावधीत आलेे होते त्या दिवशी स्वामीच्या स्वागतासाठी भाविकांनी सुताचे नारळ व फळे दिल्याने त्यांना चक्रधर स्वामींनी त्याची महती सांगितली होती. तेव्हा पासून या पंथा मधील भाविक हा उत्सव मोठ्यास उत्साहात साजरा करतात.

दत्तवायपुर येथील मंदिरात व परिसरात या पंथातील भाविकाचे घरी चक्रधर स्वामींचे विशेष व श्रीकृष्ण मुर्ती असल्याने तर घरोघरी हा उत्सव साजरा करतात.

यावेळी ट्रस्ट अध्यक्ष आर.पी.पाटील, पुजारी ललित तळेगावकर, सार्वेचे माजी उपसरपंच मंगलदास भामरे, नारायणशेठ पाटील, योगेंद्र पाटील, अंबादास पाटील, दत्तात्रय पाटील, गोपाल पाटील, अ‍ॅड.राजेश पाटील, शत्रुघ्न पाटील, गुलाब पाटील, साहेबराव पाटील, तुकाराम पाटील, महेंद्र पाटील, राकेश पवार, निलेश पाटील, यशवंत पाटील, विजय माळी, नाना पाटील, आनंदा माळी, संदीप माळी आदी भाविक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*