जमीन संपानातील भूमिपुत्रांचा आक्रोश

0
धुळे / शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा एमआडीसी येथील सदर शेतकर्‍यांची जमीन गेल्या सात वर्षांपासून संपादीत केली आहे.
मुख्यत्वे शेतकर्‍यांना जमीन घायच्याच नाही कारण या जमिनीतून पुढील कित्येक पिढ्यांना यातून रोजीरोटी मिळेल. तरी शेतकरी शासनास सहकार्य करत आहे.

या संदर्भात धुळे संपादन अधिकारी काकुस्ते यांच्या चर्चा झाली. यात हेक्टरी 20 लाख रुपये मिळेल असे काकुस्तेंनी सांगितले.

यानंतर शेतकर्‍यांनी काकुस्तेंच्या कार्यालयातील सी.डी.भारुळे यांना या संदर्भात 8 मे 2017 ला निवेदन दिले. नाईलाजास्तव 20 ला हेक्टरी हरकतीसकट घेण्यास तयार आहोत.

यासोबत आम्हाला व मुलाबाळांना एमआयडीसीमध्ये कुठल्याही मार्गाने आर्थिक दृष्ट्या सामावून घेण्यात यावे. या भूमिपुत्रांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी कुठलाच राजकीय व सामाजिक पक्ष ही व्यथा मांडायला तयार नाही.

गेल्या सात वर्षांपासून हा रखडलेला प्रश्न आतातरी सुटेल का? असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*