पिकविमा योजनेसाठी शेतकर्‍यांचे हाल

0
धुळे । दि.5 । प्रतिनिधी-शेतकरी बांधव पिक विमा योजनेपासून वंचीत राहू नये व त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये ही खबरदारी शासनाने घ्यावी.
तसे न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, शासनाने पिक विमा योजनेची तारीख बदलल्याने शासनाच्या विरोधात न्यायालयात शेतकरी बांधवांच्या माध्यमातून याचीका दाखल करण्यात येईल, असा इशारा शिवसेेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाप्रसंगी देण्यात आला.
याबाबत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सर्वच बँकाना शेतकरी बांधवांसाठी पिक विमा योजनेची 5 ऑगस्ट 2017 ही अंतीम मुदत दिली असतांना शासनाने पुन्हा बँकाना एक दिवस आधी म्हणजेच 4 आगस्ट 2017 रोजी पिक विमा काढण्याची मुदत दिली.

इंटरनेटवर ऑनलाईन पिक विमा अर्ज करण्यासाठी देखिल 4 ऑगस्टची अंतिम मुदत ठेवण्यात आली. शासनाने शेतकरी बांधवांसाठी पिक विमा काढण्यासाठीची 5 ऑगस्ट 2017 ही अंतीम तारीख ठेवली होती ती रद्द का करण्यात आली? बँकेने पिकविमा भरुन घेण्यास असमर्थता दाखविल्यामुळे शेतकरी महाईसेवा केंद्र, सायबर कॅफेवर दिवस-रात्र उभा आहे.

मात्र वेबसाईट सर्व्हर सुरू न झाल्यामुळे पिकविमा काढता आला नाही. शासनाने पिकविमा योजनेतून मुदत दिली असतांना त्यातून बँकांना वगळण्याचे कारण काय? तसेच महाईसेवा आणि सायबर कॅफे यांच्यावर प्रचंड लोड आल्याने सर्व्हर सुरू होऊ शकले नाहीत.

नेटवर्कच्या अडचणी वेबसाईट सुरू होत नसेल तर अशावेळी ऑफलाईन पिकविम्याचे अर्ज भरुन घेण्यासाठी व्यवस्था कृषी विभागामार्फत केली पाहिजे.

तांत्रिक अडचणीच्या काळात परिस्थिती वेगळे रुप घेत असेल तर हाताळण्यासाठी उपाययोजना काय? त्यासाठी ऑफलाईनचा पर्याय का नको?शासनाने शेतकरी बांधवांसाठी पिकविमा योजनेचा कालावधी वाढवून द्यावा.

पुरेशा पावसाअभावी शेतकर्‍यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. आंदोलनाप्रसंगी जिल्हापप्रमुख हिलाल माळी, कैलास पाटील, अ‍ॅड. पंकज गोरे, डॉ. सुशिल महाजन, गंगाधर माळी आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*