शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी विजय जाधव बनले ‘पोतराज’

0
कापडणे । दि. 5 । प्रतिनिधी-अंगावर आसूड ओढल्यानंतर देवही प्रसन्न होतो, यामुळे सरकारला सुबुध्दी येत शासन या आंदोलनामुळे शेतकर्‍यांवर प्रसन्न होईल अशा आशेतुन हे आंदोलन चाललयं, असे विचार मांडत सांगलीचे विजय जाधव हे राज्यभर कडक लक्ष्मी बनुन शेतकर्‍यांमध्ये जागृती करत फिरताहेतं.
पोतराजच्या भूमीकेतील श्री. जाधव हे केवळ स्वत:च्या अंगावरच चाबूक ओढुन घेत नसुन सरकारच्या धोरणांवर चाबूक ओढत आहेत.

संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. वीजबील माफच झाले पाहिजे. तोपर्यंत तथाकथित पुढार्यांना पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करुच देणार नाहीत. पालकमंत्र्यांनाही इशारा आहे.

त्यांच्या जवळ जर शेतकर्यांविषयी कणव असेल तर त्यांनी कर्जमाफीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा त्यांना ध्वजारोहण करु देणार नाहीत; असा इशारा विजय जाधव हे देत आहेत. गावा-गावात याबाबत ते शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करत आहेत.

बळीराजा शेतकरी संघाचे प्रदेश प्रवक्ता असलेले विजय जाधव हे राज्यभर कर्जमाफी संदर्भात जागृती करण्यासाठी कडक लक्ष्मीचे रुप धारण करीत आहेत.

आसूड ओढत, नाट्यछटा सादर करीत, गंभीर भाषणातून शेतकर्‍यांच्या भावना मांडत आहेत. तर पुढार्‍यांवर टिका करीत आहेत. कापडणे येथील लेनीन चौकात त्यांनी सभा घेतली. यास मोठा प्रतिसाद मिळाला.

यावेळी सरपंच भटू पाटील, शरद माळी, भय्या बोरसे, सुमीत माळी, महेश माळी, विठोबा माळी, जिजाबराव माळी , प्रशांत पाटील , बिपीन माळी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यासमोरही ओढला आसूड
झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विजय जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेसमोरही आंदोलन केले.

आ. किसनराव खोपडे, खरेदी विक्री संघाचे बापू खैरनार, युवक काँग्रेसचे अलोक रघुवंशी, तौसिफ खाटीक, अविनाश थोरात उपस्थित होते.

तर जिल्ह्यात पिंपळनेर येथेही जोरदार आंदोलन शेतकर्‍यांशी संवाद सासाधला. यावेळीज उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत भदाणे, माजी जिल्हाध्यक्ष भटू आकलाडे, सुभाष आकलाडे, ए.बी.मराठे, हिरामण पाटील, प्रताप पाटील, राजेंद्र पाटील, भावसार, शांताराम गांगुर्डे, धुडकू गांगुर्डे, पंढररीनाथ गांगुर्डे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*