बभळाज फाट्यानजीक महिलेवर बलात्कार

0
धुळे । दि.5 । प्रतिनिधी-लग्नाचे आमिष दाखवून व मुलाला ठार मारण्याची धमकी देवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकी आली आहे. या प्रकरणी एका विरुध्द थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भावेर, ता. शिरपूर शिवारात राहणार्‍या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून व तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देवून सन 2015 पासून ते 24 जुलै 2017 दरम्यान भावेर शिवारातील टेकड्यांच्या आडोशाला बभळाज फाट्यानजीक प्रकाश जगन गुजर (वय45) रा. भावेर याने त्या महिलेवर बलात्कार केला व ती गर्भवती राहिली.

याबाबत त्या पीडित महिलेने थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 376 (1), 376 (2) (एच) (एन), 506 प्रमाणे प्रकाश जगन गुजर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई जे.जी.महाले हे करीत आहेत.

मोटार सायकल चोरी
शिरपूर शहरातील सुभाष कॉलनीत राहणारे शेतकरी विरेंद्रसिंग शांतीलाल राजपूत यांनी त्यांच्या मालकीची दहा हजार रुपये किंमतीची एमएच18 एएफ 7835 क्रमांकाची मोटार सायकल शिरपूर-आमोदे फाट्याजवळ लावलेली होती अज्ञात व्यक्तीने सदर मोटार सायकल चोरुन नेली. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात विरेंद्रसिंग राजपूत यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ खोंडे हे करीत आहे.

वासरुची चोरी
शहरातील चाळीसगाव रोड लगत असलेल्या शंभरफूटी रोडवरील म्हाडा गोडामाजवळ दीपक रामकृष्ण वाघ रा. पुर्वहुडको यांच्या मालकीचे पाच हजार रुपये किंमतीचे वासरु चार जण लालरंगाच्या टाटासुमो गाडीतून नेत असतांना रंगेहात पकडले याबाबत दीपक रामकृष्ण वाघ यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379, 511 प्रमाणे नदीम काल्या, इम्रान रोटी आणि अन्य दोन जण यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई तडवी हे करीत आहेत.

युवती बेपत्ता
साक्री तालुक्यातील बोधगावपैकी चिंचपाडा येथे राहणारी अर्चना शिरलाल जगताप (वय18) ही दि. 26 जुलै रोजी घरात कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती मिळून आली नाही. याबाबत अरुण सोमनाथ गायकवाड यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन मिसिंग दाखल करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ मोरे हे करीत आहेत.

जळाल्याने मृत्यू
ककाणी, ता. साक्री येथे राहणारी सुरेखा मनोहर भिल (वय23) ही घरात चुलीवर चहा करीत असतांना तिच्या साडीने पेट घेतला त्यात सुरेखा ही गंभीररित्या जळाली. तिला म्हसदी प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तिची प्रकृती अधिक खालवल्याने तिला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना डॉ. मोसीन मुल्ला यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात रवींद्र भिलाजी माळी यांनी माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विहिरीत बुडून मृत्यू
धुळे तालुक्यातील बोरीस येथे राहणारी मिनाक्षी भानुदास पाटील (वय28) ही बोरीस-मेहेरगाव रोडवरील धरणात असलेल्या गावठाण जागेतील विहिरीत पडून मयत झाली. तिला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मिनाक्षीला मृत घोषित केले. याबाबत विलास सीताराम देवरे यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोसई ए.टी.सोनवणे हे करीत आहेत.
विजेचा धक्का लागून मृत्यू
थाळनेर, ता. शिरपूर येथे राहणारा सुनिल ताराचंद तेले (धनगर) (वय42) हा शेतात काम करीत असतांना दि. 31 जुलै रोजी दुपारी 4 वाजता त्याला विजेचा शॉक लागला. जखमी अवस्थेत सुनिलला उपचारासाठी शिरपूर कॉटेज रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेतांना डॉ. दीपक जाधव यांनी सुनिलला मृत घोषित केले. याबाबत पी.एस.पवार यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ पाटोळे करीत आहेत.

विष घेवून आत्महत्या
मोघण ता. धुळे येथे राहणारा काशिनाथ जगन्नाथ वाणी याने काहीतरी विषारी औषध घेतले. त्याला त्रास होवू लागल्याने आनंदा जगन्नाथ माळी यांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून काशिनाला मृत घोषित केले. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शेतात मेंढ्या चारल्याचा वाद; गुन्हा दाखल
साक्री तालुक्यातील शेलबारी गावाजवळ मेंढपाळ जगन शित्या टकले (वय35) याने शेतात मेंढ्या चारल्याच्या संशयावरुन दि.3 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता येला गोमा मारकरसह 11 जणांनी जगन टकलेशी वाद घालून त्याला मारहाण केली यात जगन हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात जगन शित्या टकले यांनी फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506 प्रमाणे येला गोमा मारकर, भिका सोमा मारकर, बबन बाबू हलकर, बबन सोमा मारकर, सोमा कंजी मार्केड, पोपट सुभाष मारकर, संभाजी सुभाष मारकर, बापू सदा हालकर, दावल बाबू हालकर, कलशीवर बाळू हालकर, कारभारी गोमा मार्केड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ के.एल.परदेशी हे करीत आहेत.

विवाहितेचा छळ
शिरपूर तालुक्यातील खर्दे गुजर येथे राहणारे तुलशी उर्फ रुपाली गुणवंत उर्फ शशिकांत पाटील या विवाहितेला मुलबाळ होत नाही म्हणून तसेच तिच्या चारित्र्याचा संशय घेवून व पैशाची मागणी करुन तिचा पतीसह पाच जणांनी छळ केला तसेच धमक्या दिल्या. याबाबत तुलशी पाटीलने शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 498 (अ), 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुणवंत उर्फ शशिकांत नरोत्तम पाटील, नरोत्तम भबुता पाटील, मोतनबाई नरोत्तम पाटील, हेमंत नरोत्तम पाटील आणि कविता घन:श्याम पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ शिरसाठ हे करीत आहेत.

पुलावरुन पडल्याने मृत्यू
धावत्या रेल्वेतून अमरावती ब्रीजवरुन नरेशकुमार एस. महेश सरय्या (कौल) (वय30) हा पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दोंडाईचा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासून नरेशकुमारला मृत घोषित केले. याबाबत अनिल जगन्नाथ टेकाळे यांनी माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जगदाळे हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*