अंगणवाडी कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देणार – आ.कुणाल पाटील

0
धुळे । दि.5 । प्रतिनिधी-राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसह विविध मागण्या रास्त असून सरकार त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे.
कर्मचार्‍यांना न्याय मिळावा म्हणून विधानसभेत लक्षवेधी मांडून लढा देत आहोत. त्यामुळे आम्ही अंगणावाडी कर्मचार्‍यांसोबत असल्याची ग्वाही आ. कुणाल पाटील यांनी अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आ. कुणाल पाटील यांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना पाठींबा देण्यासाठी मोर्चेकरी कर्मचारी व पदाधिकार्‍याना भेट दिली.

यावेळी सभेत बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासह आशा कर्मचार्‍यांना न्याय मिळावा म्हणून विशेष लक्षवेधी मांडली होती, त्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांची बाजू प्रभावीपणे मांडतांना सांगितले होते कि, देशातील इतर राज्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळत असलेले मानधन आणि राज्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळत असलेले मानधन आणि महाराष्ट्रातील तुटपूंजे मानधन यांच्यातील मोठी तफावत आहे, शिवाय कुपोषण मुक्तीच्या लढ्यातील अंगणवाडी कर्मचारी महत्वपूर्ण घटक असल्याने शासन या घटकाकडे दुर्लक्ष करून कुपोषण मुक्ती चळवळीला हरताळ फासत असल्याचा आरोप केला.

त्यासाठी राज्यातील वाडा,वस्ती,पाडा अशा ठिकाणी सुरू असलेल्या 11 हजार मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर नियमित अंगणवाड्यात करण्याची त्यांनी ठोस मागणी केली होती.

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन कोणतीही ठोस कार्यवाही करणार आहे आणि त्यासाठी कालबध्द कृती कार्यक्रम हाती घेणार आहे का असे प्रश्न उपस्थित करून शासनाला ठोस आश्वासन देण्यास भाग पाडले.

त्यावर महीला बालकल्याण मंत्री ना.पंकजा मुंढे यांनी आश्वासन दिले होते की, मानधन वाढीसह विविध मागण्याचा प्रस्ताव सरकारपुढे लवकरच ठेवला जाणार असून योग्य तो निर्णय घेवून त्यांना न्याय दिला जाईल.

मात्र जोपर्यंत अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा आहे त्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले होते.

महामोर्चाप्रसंगी आ.कुणाल पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी धुळे तालुक्यातील मुकटीनजीक भीषण तिहेरी अपघात झाला होता त्यात आशा कर्मचार्‍यांचा कर्तव्य बजावत असतांना मृत्यू झाला.

यावेळी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री दादा भूसे यांनी भेट देवून भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.

तसेच याबाबत अधिवेशनातही आवाज उठविला होता मात्र सरकारकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचे आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*