पुलाच्या निकृष्ठ कामामुळे भाविकांची गैरसोय

0
सामोडे | वार्ताहर :  साक्री तालुक्यातील सामोडे येथून जवळच असलेले भाविकांचे श्रध्दास्थान श्री तिर्थक्षेत्र गांगेश्‍वर महाराज मंदिरात दर्शनासाठी शेकडो भाविक जात असतात. भाविकांना येण्या- जाण्यासाठी बांधलेल्या पुलाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. त्या पुलावरील लोखंडी गज बाहेर आल्याचे दिसते.

यासंदर्भात दै.‘देशदूत’ने ७ ऑक्टोंबर २०१५ रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने पुलाची दुरूस्ती करण्याचे सांगीतले होते. मात्र श्रावण महिना सुरू झाला आहे. भाविकांची याठिकाणी भाविकांची येण्या-जाण्याची गौरसोय होत आहे.

मात्र ठेकेदाराने याकडे लक्ष पुरविलेले नाही. पुलावरचे गज उघड्यावर होते, त्याचठिकाणी पुन्हा कॉंक्रीटीकरण पाहिजे होते. मात्र ते न झाल्याने वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गज उघडे झालेल्या ठिकाणीच कॉंक्रीटकरण करण्यापेक्षा संपुर्ण पुलावरच नवीन कॉंक्रीटीकरण करावे अशी मागणी होत आहे.

कारण याठिकाणी कायम भाविकांची मोठी गर्दी होत असते. श्रावण महिन्यात तर ही संख्या मोठी असते. भाविकांच्या वाहनांना अडथळा निर्माण होवू नये म्हणून पुलावर ठेकेदाराने कॉंक्रीटीकरण केले पाहिजे.

सामोडे गावापासून एक किलोमिटर अंतरावर असणार्‍या निसर्गरम्य परिसरात पांझरा नदीच्या व जामखेलीच्या संगमावर असणारे पुरातन कालीन जागृत देवस्थान श्रीक्षेत्र गांगेश्‍वर महाराज मंदीर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. भाविक गांगेश्‍वर मंदिरावर दर्शनासाठी भाविक लांब पल्यावरुन दर्शनासाठी येत आहेत.

याठिकाणी कायमस्वरुपी भाविकांची व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. भाविकांना मंदिरात पोहचण्यासाठी पांझरा नदीच्या पात्रातून रस्ता तयार करावा लागत होता. कधी काळी जास्त पाणी आले तर भाविकांना दर्शनापासून वंचित रहावे लागत होते.पांझरा नदी पार करण्यासाठी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी  केली होती.

त्याची दखल घेऊन साक्री तालुक्याचे नेते आणि सामोडे गावातील रहिवास शिवाजीराव दहीते यांनी जि.प.मार्फत पुलाचे काम १ ते दीड वर्षात पुर्ण केले. त्यामुळे भाविकांचा मंदिरावर जाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटला. भाविकांनी समाधान व्यक्त केले.

मात्र त्या ठेकेदाराने पुलावरचे काम अतिशय निकृष्ठ केल्याने भाविकांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला होता. पुलाच्या कामासाठी वापरलेले लोखंड हे कमी ग्रेडचे असल्याने काही दिवसातच पुलावरचे लोखंड उघड्यावर आले. ‘देशदूत’ने बातमी प्रसिध्द केली.

पुलावर नवीन कॉंक्रीटीकरण करण्याची मागणी केली. पण त्या ठेकेदारांचे जेवढे लोखंडे उघड्यावर दिसत आहे. तेवढ्याच जागी कॉंक्रीटीकरण केले. तसे न करता संपुर्ण पुलावर कॉंक्रीटीकरण करा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*