माहेरवाशिणींनी पिंपळनेरात साजरी केली अनोखी मंगळागौरी

0
पिंपळनेर | वार्ताहर :  पिंपळनेर येथे लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर निमित्ताने झीम्मा, फुगडीने महिलांनी केली साजरी. मंगळागौर नृत्य बघण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. श्रावण सखी मंगळागौर ग्रुप नाशिकच्या महिलांनी दोन तास नृत्य सादर केले.

आषाढ महिना सुरु झाल्यावर उन पावसाचा खेळ रंगत श्रावणाची चाहुल लागते. श्रावण हा हवा हवासा वाटणारा महिना. उन पावसाच्या या खेळात सायंकाळी इंद्रधनुष्याची दुर्मिळ शोभा श्रावणशोभेत मोठी भर घालते.

निसर्गातील ताजेपणा, मनाची प्रसन्नता आणि संयमित आहार-विहार म्हणजेच सदासर्वकाळ श्रावण असणे होय. श्रावण महिन्यापासून चार्तुमासाला सुरवात होते. श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र महिना, व्रत वैकल्यांना प्रारंभ होतो. त्यात मंगळागौरीचे खेळ सुहासिनींच्या घरी दिसू लागतात.

लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. या मंगळा गौरी पुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सौ.दर्शना वल्लभ महाजन यांच्या पहिल्या मंगळा गौरच्या निमित्ताने सौ.रेखा संजय जोशी व दिव्या संजय जोशी यांनी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात यांनी केले. त्यांना यशश्री महिला मंडळाने मोलाची साथ दिली.

यावेळी सरस्वतीपुजन, मंगळागौर पुजन, दिप प्रज्वलन, श्रावण सखी मंगळा गौर ग्रुप नाशिकच्या संचालिका सौ.सुरेखा पंडीत, सौ.लता महाजन, सौसंध्या भंडारी यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन सौ.दिपाली दळवेलकर व सौ.मयुरी विवेक पेंढारकर यांनी खुमाकदार शैलीत केले.

इशस्तवन यशस्वी महिला मंडळाच्या सौ.पुष्पलता प्रभाकर कोठावदे यांनी केले.
श्रावणसखी मंगळा गौर ग्रुप नाशिकच्या महिलांनी झींम्मा, फुगडी, सह जुने पारंपाररिक विविध नृत्य गीतासह सादर केली. उपस्थित महिलांची दाद मिळवून घेतली.

पिंपळनेरच्या असंख्य महिलांनी या नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. अशाप्रकारे पिंपळनेर येथे मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांनी उखाणे ही घेतले. शेवटी आभार सौ.रत्ना लोखंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*