मोघण येथील शेतकर्‍याची आत्महत्त्या

0

आर्वी । दि.4 । वार्ताहर-धुळे तालुक्यातील मोघण येथील प्रगतशील शेतकरी काशिनाथ जगन्नाथ माळी या शेतकर्‍याने कर्जबाजारी-पणामुळे आपल्या शेतात विषप्राशन करुन आत्महत्या केली.

याबाबत असे की मोघण येथील प्रगतशील तरुण शेतकरी काशिनाथ जगन्नाथ माळी (वय45) यांच्याकडे दोन एकर शेती होती.

अल्पभूधारक असल्यामुळे त्याच्यावर पिककर्ज, ठिंबक सिंचनाचे इतर बँकांचे कर्ज आहे. या विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जाते.

काशिनाथ माळी यांना दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरींग कोर्स करीत असल्यामुळे त्याचा शिक्षणाचा भार देखील त्यांच्या खांद्यावर होता.

परिसरातील विहिरींनी पुर्णपणे तळ गाठले असून शेतीसह पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होईल. गेल्या अनेक दिवसांपासून हा शेतकरी आर्थिक विवंचनेत फिरत होता.

आता त्याच्या शेतामध्ये कापूस पिकाची लागवड केलेली असून पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट परिसरातील शेतकर्‍यांवर येवून ठेपले आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतू शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होत नसल्यामुळे व प्रत्यक्षात कर्जमाफी कधी होईल असे प्रश्न शेतकर्‍यांपुढे आहे.

 

LEAVE A REPLY

*