लाचेच्या मागणीने धुळ्याचे नायब तहसीलदार हरीष गुरव, लिपीक प्रदीप देवरेना झाली अटक

0
धुळे | प्रतिनिधी :  शेत जमीन बिनशेती करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी १५०० रूपयांची लाच घेतांना नायब तहसीलदार हरीष बजरंग गुरव व लिपीक प्रदीप शरद देवरे यांना धुळ्याच्या लाचलूचपत प्रतिबंध विभागाने आज लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरून गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

यातील तक्रारदार यांची जुनवणे गावाच्या शिवारात गट.न.५५/२ ब /१/ अ मध्ये हेक्टर २ २५ आर शेत जमीन आहे. सदर शेती बिनशेती होण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी धुळे यांच्याकडे सन २०१५ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी तहसीदार धुळे ग्रामिण यांच्या कार्यालयात जात याबाबत नारयब तहसीलदार हरीष बजरंग गुरव यांची भेट घेत विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमचा बिनशेती प्रयोजनाचा प्रस्ताव माझेकडे आहे. त्यावर प्रस्ताव शिफारसीसह मंजुरीसाठी लवकर पाठवण्याची विनंती केली.

त्यावर त्यांनी लिपीक प्रदीप देवरे यांना भेटून ते सांगतील त्याप्रमाणे करण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी लिपीक प्रदीप देवरे यांची भेट घेत विचारले असता प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी नायब तहसीलदार गुरव यांनी १५ हजार रूपये संगितले असल्याचे सांगितले.

त्यानुसार तक्ररदारांनी याबाबत धुळ्याच्या लाचलुपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. या तक्रारी नुसार ंपंच साक्षीदार यांच्या समक्ष पडताळणी करता नायब तहसीलदार हरीष गुरव व लिपीक प्रदीप देवरे यांनी तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रूपयांच्या केलेल्या मागणीच्या ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरून सिध्द झाल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.

यासाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक शत्रुघ्न माळी, पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, पोनि पवन देसले यांच्या पथकातील पोहेकॉ जितेेद्रंसिंग परदेशी, पोना कैलास शिरसाठ, सतीष जावरे, कैलास जोहरे,कृष्णकांत वाडीले, देवेंद्र वेंन्देे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, पोका प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे व संदीप कदम यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*