धुळे: इंदूर मनमाड रेल्वे मार्गाचे लवकरच भूमिपूजन- रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा  

0
धुळे : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या इंदूर मनमाड रेल्वे मार्गाचे लवकरच भूमीपूजन करण्यात घेणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज धुळ्यात केली.
प्रभू यांनी आज या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना प्रभू बोलत होते . प्रभू पुढे म्हणाले की जनतेला केवळ खूष करण्यासाठी पुर्वी फक्त घोषणा व्हायच्या आताचे सरकार काम करते आणि मग बोलते मनमाड इंदूर मार्गाचा डी पी आर 3 जुलै रोजी तयार होऊंन रेल्वे बोर्डाला सादर झाला आहे.
यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली प्रक्रिया पूर्ण केली असून मध्य प्रदेश सरकारचे पत्र बाकी आहे यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे होणार आहे
त्यामुळे शेतकयांचा फायदा होईल 9 हजार कोटींचा हा रेल्वे मार्ग असून यासाठीं एकूण 3538 हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे धुळ्याने देशाला खुप दिले पण धुळ्याला काही मिळत नव्हते तो अन्याय आता दूर होणार आहे. आता हा प्रकल्प स्वप्न राहणार नाही तर प्रत्यक्ष साकारणार आहे असेही प्रभू म्हणाले
 खासदार ए टी पाटील खासदार डॉ हीना गावीत यांनी केली नव्या रेल्वे गाड्यांची मागणी
आढावा बैठकित खासदार ए टी नाना पाटील यांनी सांगितले की जळगाव साठी आजपर्यंतच्या  रेल्वेमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या परंतू पूर्तता केली नाही अमळनेर धुळे लाईनचे सर्वेक्षण झाले आहे. चाळीसगाव औरंगाबाद रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे परंतु मंजुरी मिळत नाही.
जळगाव मोठे औद्योगिक शहर आहे येथून रोज50 कंटेनर जातात मात्र माल साठविण्यासाठी  पुरेसे स्टोरेज नाहीत त्यामुळे भादली पाळधी येथे सुविधा उपलब्ध करावी तसेच जळगाव मनमाडसाठी तिसरी लाईन टाकण्यात यावी यावेळी हीना गावित यांनी नागपूर मुंबई व्हाया नंदूरबार मार्गे तसेच नंदुरबार पुणे रेल्वे सुरु करण्याची मागणी केली

LEAVE A REPLY

*