दोंडाईचा पालिका हगणदारीमुक्त : दीड कोटीचे बक्षीस

0
दोंडाईचा |  प्रतिनिधी  :  दोंडाईचा हगणदारीमुक्त केल्याबद्दल शासनाकडून दोंडाईचा पालिकेस दीड कोटी रूपंयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

दोडांईचा नगरपलीकेच्या कामाची माहीती घेण्यासाठी २० मार्च रोजी जिल्हा स्तरीय समितीचे सदस्य शिरपुर विभागाचे कार्यकारी दडांधिकारी मा नितीन गावंडे व शिरपुर तहशीलदार  महेश शेलार यांनी उघड्यावरील शौचास बसत असलेल्या नदी पाञांची व सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली होती व आरोग्य विभागाच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

त्यांनी आपला अहवाल राज्य शासनास पाठवीला होता त्याच अनुषंगाने राज्य शासनाने राज्यस्तरीय समीतीत भिवंडी-निजामपुर महानगरपलिकेचे उपायुक्त अनिल डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली समीती नियुक्त करून समितीत सदस्य म्हणुन भडगांव नगरपलीकेचे मुख्यधिकारी  राहुल पाटील , जेष्ठ पञकार  गोपीनाथ लांडगे व सामाजिक कार्यकर्ते  सुनिल वाणी इ सदस्यांचा समावेश होताU

याप्रसंगी समीतीने दिनांक १ जुलै रोजी वृक्षारोपण करून शहरातील पाहणी दौरा केला शहरातील अमरावती नदी , शहादा रोड , लेंढुर नाला , मांडळ रोड , चैनी रोड इ ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व तेथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून नागरीकांशी चर्चा केली तसेच व्यक्तीगत लाभार्थींची भेट घेतली व त्यांनी आपला अहवाल राज्य शासनास कळवीला.

त्यानुसार राज्य शासनाने सदर अहवाल केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आला यांनी केंद्रिय पथकाने एका ञयस्थ विभागातर्फे तपासणी करण्याचे निश्चित केले त्यानुसार समितीत केंद्रीय गुणवत्ता तपासणी खात्याचे निरीक्षक  मयुर उदारे यांनी दोडांईचा शहरातील शहादा रोड, अमरावती नदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसर, भोगावती नदी, गांव भाग, नगरपलीका शाळा क्रं १० व डि आर हायस्कुल येथील शौचालये यांची तपासणी केली.

त्यांच्या समवेत दोडांईचा मुख्यधिकारी अजित निकत ,माजी विरोधी पक्ष नेते प्रविण महाजन , सभागृह नेते रणवीरसिंह देशमुख ,नगरसेवक रवी उपाध्ये , नरेंद्र गिरासे , संजय तावडे , किशन दोधेजा , जितु गिरासे सर , कृष्णा नगराळे , सुफियान तडवी ,संदिप धनगर ,मुख्य अभियंता जगदीश पाटील , आरोग्य निरीक्षक शरद महाजन , घनश्याम बनसोड , सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

नगरपलीकेच्या आरोग्य विभागातर्फे समितीच्या सदस्यांना माहीती देतांना प्रविण महाजन यांनी सांगीतले कि, ना जयकुमार रावल व नगराध्यक्षा यांच्या आदेशान्वये नगरपलीकेच्या हगणदारी मुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर कामाची सुरूवात झाली त्यात शहरातील अमरावती , भोगावती या नद्या व लेंढुर नालावरील सर्व काटेरी झुडपे काढण्यात येऊन नद्या स्वच्छ करण्यात आल्या तसेच शहरातील १२५९ कुटुंबाना व्यक्तीगत शौचालयासाठी केंद्र , राज्य शासन व नगरपलीका यांच्या मदतीने १७००० रू इतके अनुदान प्राप्त करून देण्यात आले .

त्यांत अत्यंत गरजु नागरीकांना रोटरी क्लबच्या सहाय्याने अत्यावश्यक साहित्य देखिल पुरवीण्यात आले त्याचप्रमाणे शहरात जवळपास ५०० सिट इतके सार्वजनिक शौचालय आवश्यकतेनुसार प्रत्येक भागात उपलब्ध करून शहरातील सर्व जुने व जिर्ण अवस्थेतील शौचालय दुरस्ती करून काही ठिकाणी एफ आर पी शिटचे आकर्षक शौचालये बसवुन नागरीकांसाठी सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आली असुन तरी देखिल नागरीक उघड्यावर शौचास बसलेले आढळले तर पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती.

याप्रसंगी समितीच्या सदस्यांनी हगणदारी मुक्तीसाठी नगरपलीकेचे प्रयत्न वाखवण्याजोगे असुन उत्तम काम केल्याचे सांगीतले म्हणुनच दोडांईचा शहर हे हगणदारी मुक्त झाल्याचे घोषीत केले व शासनाने दोडांईचा वरवाडे नगरपरीषदेच्या कामाचा गौरव करून दिड कोटी रू  बक्षिस घोषित करून मुख्यमंत्री ना. देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा नयनकुवँरताई रावल, आरोग्य सभापती  वैशाली प्रविण महाजन यांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख बक्षिस मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*