एमआयडीसी कार्यालयाच्या स्थलांतराचा डाव

0

धुळे / धुळे जिल्ह्यातून विविध विभागीय कार्यालये जळगांव येथे स्थलांतरीत करण्याचा सपाटा सुरु असून यामुळे धुळे जिल्ह्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वी जीवन प्राधिकरण कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उच्चदाब कार्यालय यापूर्वीच धुळे येथून जळगांव येथे स्थलांतरीत करण्यात आले आहेत.

यामुळे धुळे एमआयडीसी कार्यालय जळगावात स्थलांतरीत करू नये अशी मागणी माजी आ. प्रा.शरद पाटील यांनी केली आहे.

सध्या धुळे येथे असणारे विक्रीकर आयुक्त कार्यालय अर्थमंत्रीसुधीर मुनगुंट्टीवार यांच्या आदेशाने जळगांवकडे स्थलांतरीत करण्यात आले असून सदर कार्यालय स्थलांतरीत झाल्यामुळे धुळे व नंदूरबार येथील उद्योजकांना गैरसोय झाली आहे.

धुळे जिल्ह्यातील विविध प्रादेशिक कार्यालयांना जळगांव येथे हलविण्यात येत असल्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे.

धुळे येथील प्रादेशिक महाराष्ट्र औद्योगीक विकास कार्यालय जळगाव येथे स्थलातंतरीत करण्याच्या जोरात हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे.

ना.गिरीश महाजन यांनी आज,दि.11 मे 2017 रोजी मंत्रालयात धुळे येथील कार्यालय स्थलांतरीत करण्याबाबत बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत कार्यालय स्थलातंरीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात विद्यमान सरकारबद्दल तीव्र नाराजी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

*