दोंडाईचा रोटरी क्लबतर्फे अपंग निराधार मुलांसाठी ‘रोटी बँक ’

0
दोंडाईचा | प्रतिनिधी :  दोंडाईचा रोटरी सिनियर्स क्लबच्या वतीने दोडांईच्यात रोटी बॅक सुरू शहरातील अपंग गरीब निराधार मुले मुली महिला व्यक्तींना दररोज सकाळी मिळणार दोन पोळ्या सदर उपक्रमात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अन्नदान या उपक्रमाप्रसंगी डॉ रवींद्रनाथ टोणगांवकर केले.

दोंडाईचा येथील रोटरी क्लब ऑफ सिनियर्स यांच्यातर्फे शहरातील अहिंसा चौका जवळ अपंग गरीब नागरिकांसाठी रोटी बॅक सुरू करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उघाटन डॉ रविंद्रनाथ टोणगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष नामदेव थोरात, सचिव डॉ मुंकूद सोहनी, के.एम. अग्रवाल, सौ आशाताई टोणगांवकर, डॉ अनिल सोहनी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ हुसेन विरदेलवाला, भाजपाचे प्रविण महाजन, डॉ राजेंद्र गुजराथी, राजेश भंडारी, चेतन सिसोदीया, देशपांडे, प्रशांत ठोमरे, एन.के.मालपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना डॉ टोणगांवकर म्हणाले की, रोटरी सिनियर्सच्यावतीने अपंग गरीब नागरिकांसाठी कायम स्वरूपी रोटी बॅकच्या माध्यमातून दररोज मोफत रोटी वाटप करण्यात येईल

यासाठी समाजातील सर्व स्तरातील दात्यांनी पुढे यावे असे आवाहन डॉ.टोणगावकर यांनी केले. तर सौ आशाताई टोणगांवकर म्हणाल्या की, अपंगांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोंडाईचा रोटरी सिनियर्सक्लबचे चेतन सिसोदीया प्रशांत ठोमरे राजेश भंडारी हुसेन भाई आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*