कापडणे पाणी योजनेची चौकशी करा!

0
कापडणे । प्रतिनिधी-कापडणे पाणी पुरवठा योजनेची सखोल चौकशी करत दोषींवर फौजदारी सखोल चौकशी करत दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा अशा आशयाची मागणी कापडणे ग्रामपंचायतीने आज दि. 25 रोजी केली.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. ग्रा.पं. सरपंच व पदाधिकार्‍यांनीच चौकशी व गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने आता पाणीयोजनेचे प्रकरण काय कलाटणी घेते, याकडे परिसराचे लक्ष लागून आहे.

गेल्या पन्नासवर ग्रामसभाचा पाणी योजनेच्या विषयाभोवतीचे फिरल्या व वादळी ठरल्या. या पार्श्वभूमीवरच 15 ऑगस्ट पुर्वी चौकशी अहवालाची मागणीही ग्रा.पं.ने आज केली असल्याचे समजते. जेणे करुन त्या ग्रामसभेत अहवालावरुन ग्रामस्थांना उत्तर देता येईल.

खान्देशातील स्वतंत्र गावासाठीची सर्वात मोठी योजना अशी ओळख असणार्‍या येथील पाणीयोजनेचा गुंता सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.

या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु होवून एक दशक उलटूनही ही योजना मात्र आरोप-प्रत्यारोपातच अडकली आहे. या योजनेच्या चौकशी संदर्भात आता ग्रा.पं.नेच चौकशीची मागणी केली आहे.

ग्रा.पं.च्या सत्ताधारी पक्षाकडेच पाणी योजनेची सध्या सुत्रे आहेत हे विशेष ग्रा.पं. सरपंच भटू गोरख पाटील, सदस्य मनोज पाटील, प्रमोद पाटील, भैय्या बोरसे, रऊफ पिंजारी, रमा भामरे आदींनी आज जि.प.कार्यालय गाठत पाणी योजने संदर्भात निवेदन दिले.

जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन यांना दिलेल्या निवेदनात ग्रा.पं.ने येत्या 15 ऑगस्ट पुर्वी येथील पाणी योजनेची चौकशी करुन चौकशी अहवाल मिळावा तसेच अहवालानुसार सध्याची वा पुर्लीची जी समिती दोषी असेल त्या पाणी पुरवठा समितीवर फौजदारी स्वरुपांचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. ग्रा.पं.च्या या मागणीनंतर चौकशीचे प्रकरण नेमके कुठे वळण घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*