कुख्यात गुंड गुड्या हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी दादू देवरे ताब्यात

0
धुळे | प्रतिनिधी :  कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या हत्या प्रकरणातील दुसरा संशयीत आरोपी दादू रमेश देवरेला पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे. दादू देवरे हा राजा भद्राचा लहाण भाऊ आहे.

दादू हा कासारे परिसरात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे व उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मंत जाधव, पोनि.रमेशसिंह परदेशी, पोनि. अनिल वडनेरे यांना मिळाली.

 

त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिराला लृरागी, हवालदार मिलींद सोनवणे, नोना. मुख्यार मन्सुरी यांनी कासारे गावात सापाळा रचला.

त्यावेळी दादू देवरे हा आढळून आला असता त्यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

यापुर्वी अटक करण्यात आलेल्या सागर साहेरबराव पवार उर्फ कट्टी (वय२२ रा. धुळे) याला न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

*