युवकाच्या मृत्यू प्रकरणी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा

0

धुळे / वाळू ठेकेदार आणि बेजबाबदार महसूली अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संगनमतातून झालेल्या अवैध वाळू उत्खननामुळे अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला.

अशा गंभीर आरोपाचा एक दावा दाखल करून घेत शिंदखेडा न्यायालयाने आज प्रांताधिकारी, दोन तहसिलदार, दोन तलाठी, दोन मंडळाधिकारी, तीन ठेकेदार, अशा दहा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

त्यानुसार किशोर भगवान कोळी यांच्या फिर्यादीप्रमाणे शिंदखेडा पोलिस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल झाला. त्यामुळे महसूली अधिकारी, ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

पीडित कुटुंबाबाबत योग्य भूमिका वठविण्याऐवजी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांनी तो वाद्ग्रस्थ खड्डाच संगनमतातून बुजविण्याचा प्रयत्न केला.

तसेच उप्परपिंड आणि अक्कडसे येथे वाळू उपश्याबाबत अटीशताअचा सर्रासपणे भंग होत असतानाही जबाबदार अधिकार्‍यांकडून देखरेख, कर्तव्यबजावणीत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याकडे फिर्यादीने न्यायालयाचे लक्ष वेधले.

त्याची दखल घेत न्यायालयाने संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

LEAVE A REPLY

*