गुड्ड्याच्या मारेकर्‍यांपैकी एकास अटक : गुन्ह्याची उकल होण्यास होणार मदत

0
धुळे | प्रतिनिधी :  कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्त्येप्रकरणातील संशयित आरोपींपैंकी मुख्य सहभाग असलेला नामे सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी याला विशेष पोलिस पथकाने कामशेत येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

त्यांच्याकडून इतर आरोपी कोठे लपून बसले आहेत यासह गुन्ह्याच्या कटाबाबतची व गुन्हा करण्यामागचा हेतू व उद्देश यांची उकल होण्यास मदत होणार आहे.

गुन्ह्यातील आरोपींना आसरा देणार्‍यां लोकांचेही रेकॉर्ड काढून त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

LEAVE A REPLY

*