अजंदे बु.॥येथील जि.प.शाळेच्या डिजीटल वर्गांचे उद्घाटन

0
शिरपूर । दि.21 । प्रतिनिधी-शिरपूर तालुक्यातील अजंदे बु. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील डिजीटल वर्गांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरन देवराजन यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील डिजीटल वर्गांचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरन देवराजन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी भरत कोसोदे, अजंदे बु. येथील सरपंच चंद्रकांत पाटील, केंद्रप्रमुख श्री देवरे, उपसरपंच तुळशिराम मराठे, ग्रा.पं. सदस्य छोटू मराठे, चेतन राजपूत, अनिल भिल, सौ. ज्योतीबाई सोमवंशी, लताबाई पाटील, शहनाजबी खाटीक, श्रीमती छागोबाई जाधव, सुमनबाई भिल, हिरकनबाई ढोले, ग्रामसेवक संजय पाटील, पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावातील पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक कुरेशी, भटू माळी, श्रीमती वर्षा पाटील, श्रीमती मेघावत यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरन यांनी माहिती जाणून घेवून समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, अजंदे बु. सरपंच चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा यशस्वीरीत्या झाला.

 

LEAVE A REPLY

*