धुळ्यात एसटीवर दगडफेक

0
धुळे । दि.20 । प्रतिनिधी-धुळ्याहून चाळीसगावकडे जाणार्‍या एसटी बसवर चाळीसगाव चौफुली परिसरात अज्ञात व्यक्तीने काल रात्री दगडफेक केली.
यामुळे बसच्या चालकासमोरील काच फुटली सुदैवाने चालकाला काही दुखापत झाली नाही. याबाबत चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नंदुरबारहून औरंगाबादला एमएच 14 बीटी 1796 क्रमांकाची बस काल रात्री 11.30 वाजेच्या सुमारास धुळे बसस्थानकावरुन औरंगाबादकडे जाण्यासाठी निघाली.

रात्री 11.40 वाजेच्या सुमारास बस चाळीसगाव चौफुलीजवळ आली असता अंधारातून अचानक चालकाच्या दिशेने दगडफेक सुरु झाली.

यामुळे चालकाच्या समोरील बसची काच फुटली. सुदैवाने चालकाला दुखापत झाली नाही. चालकासमोरील संपुर्ण काच फुटून तुकडे झाले.

या घटनेनंतर चालक ईश्वर पाटील यांनी धुळे बसस्थानकातील अधिकार्‍यांना माहिती त्यानंतर बस चाळीसरोड पोलिस ठाण्यात आणली तेथे चालक ईश्वर पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसवर दगडफेक का केली? याचे कारण समजू शकले नाही. चालकाने तक्रार दिल्यानंतर बस पुन्हा औरंगाबादकडे नेली.

 

LEAVE A REPLY

*