स्वातंत्र्यानंतरही राजपूत समाजाला न्याय नाही !

0
दोंडाईचा । दि. 20 । प्रतिनिधी-देशासाठी शहीद होणारा समाज म्हणुन राजपूत समाजाची जगात ओळख आहे. राज्य, धर्म वाचविणारा हा क्षत्रिय समाज स्वातंत्र्यानंतरही वंचीत आहे. शासनाने त्यागाचा, बलिदानाचा सन्मान करणे जरूरीचे आहे.
याच तत्वांचा सन्मान करून राजपूत समाजाला आरक्षण द्यावे. क्षत्रिय समाज राजकारणात शिर्षस्थानी नसल्याने देशात अशांतता व असुरक्षीतता निर्माण झाली आहे.पुर्वजांनी या मातीसाठी, भुमीसाठी रक्त सांडले आहे.
महाराष्ट्रात लोकसंख्येच्या 9 टक्के समाज आहे. राजपूत समाजाला आजही देशात न्याय मिळत नाही. गुणवत्ता असुनदेखील पाल्य मागे राहतात.

त्याला कारण केवळ आरक्षण आहे. मुलांना 80 ते 95 % पर्यंत गुण मिळुन देखील त्यांना अपेक्षीत क्षेत्रात प्रवेश घेता येत नाही.

कुठल्याही अटी शर्ती न ठेवता राजपूत समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी सरकारकडे करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील महाराष्ट्र राज्य आरक्षण महामोर्चाचे अजयसिंग सेंगर यांनी येथे बोलताना केले.

दोंडाईचा येथे सुवर्णकार समाज मंगल कार्यालयात जिल्हा राजपूत समाज व राज्यातील समस्त राजपूत समाज संघटनांच्या वतीने राजपूत आरक्षण या विषयावर समाजबांधवांची सभा पार पडली.

या बैठकीत आरक्षण व जातवैधता प्रमाणपत्र यासह अन्य प्रश्नावर चर्चा झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी सज्जनसिंह पवार तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजपूत आरक्षण महामोर्चाचे अजयसिंह सेंगर, क्षत्रिय महासभेचे आंनदसिंग ठोके, नरेंद्रसिंह सौंकुदे, पत्रका जितेंद्रसिंह राजपूत, सोमु भैय्या, पंकजसिंग राजपूत, रेनुसिंग सेंगर, परभणी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.संजयसिंह कच्छवे, रवि शेठ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राजपूत समाजाचे गाढे अभ्यासक सज्जनसिंह पवार यांनी सांगितले की, समाजाच्या वतीने सरकार सोबत कायदेशीर लढा चालु ठेवला आहे. 1961 ची अट शिथील करणार असल्यांची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तसेच रक्ताचे नाते असल्यास व ब्लॅड रिलेशननुसार बापाला असेल तर मुलाला व्हॅलीडिटीची गरज नाही. नावापुढे भामटा न लावता सरसकट आरक्षण द्यावे.

यानंतर डॉ.संजयसिंह कच्छवे यांनी सांगितले की, राजपूत समाज सर्वधर्म समभाव जपत असुन एकमेकांना मदत करणारा समाज आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यावर दोन चार जाचक अटी काढल्यास व सर्वांना भामटा न लावता आरक्षण मिळावे, असे डॉ.कच्छवे म्हणाले.

आनंदसिंग ठोके यांनी सांगितले की, राजपूत आरक्षणासाठी 1961 चा राजपूत गुन्हेगार असल्याचा पुरावा शिथील व्हावा. सुलभ पध्दतीने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र कुठलीही अट न घालता द्यावे.

तसेच राजपूत समाज अनेक पोट जातीमध्ये विभागला गेला असुन पोट जातीतील दरी नाहीसी करून रोटी बेटी व्यवहारासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.

कुलदीप राजपूत, करणसिंग राजपूत, जयदेव राजपूत, नारायण राजपूत, दिपक राजपूत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

कार्यक्रमासाठी राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरूणांनी संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र आर गिरासे यांनी केले तर चेतन राजपूत यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*