हस्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एनसीओ परीक्षेत यश

0
दोंडाईचा । वि.प्र.-हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅन्ड ज्यु.कॉलेज-दोंडाईचा येथील विद्यार्थी माहे सप्टेंबर 2016 मध्ये सायन्स ऑलिम्पीयाड फाऊंडेशन, नवी दिल्ली यांचे वतीने आयोजित- राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल सायबर ऑलिम्पीयाड परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सदर परीक्षेत हस्तीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले.
यास्तव त्यांना- सायन्स ऑलिम्पीयाड फाऊंडेशनच्या वतीने एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉरमन्सचे-विशेष पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. यात पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ओवी बिरारी-इ.2री आंतरराष्ट्रीय पातळीवर तृतीय व विभागीय पातळीवर द्वीतीय क्रमांक-दोन हजार रुपये रोख पारितोषीक, ब्राँझ मेडल व प्रशस्ती पत्र, हर्षल बोधवाणी-इ.2री आंतरराष्ट्रीय पातळीवर अकरावा व विभागीय पातळीवर पाचवा क्रमांक-एकहजार रुपये रोख पारितोषीक, ब्राँझ मेडल व प्रशस्तीपत्र तसेच मानसी मोरे इ.2री-आंतरराष्ट्रीय पातळीवर-एकोणतिसावा व विभागीय पातळीवर- अकरावा क्रमांक, जमिला मर्चंट-इ.2री-आंतरराष्ट्रीय एकोणावीस व विभागीय पातळीवर आठवा वा क्रमांक, मयंक जैन इ.2री-आंतरराष्ट्रीय पातळीवर चोवीसावा व विभागीय पातळीवर दहावा क्रमांक, नकिया बोहरी इ.2री-आंतरराष्ट्रीय पातळीवर विसावा व विभागीय पातळीवर नववा क्रमांक, या विद्यार्थ्यांना – अकॅडेमिक बुकसेट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*