गुड्ड्याच्या शरीरावर तब्बल 27 वार ; शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट

0
धुळे । दि.19। प्रतिनिधी-गुंड गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शफियोद्दीन शेख याची काल निर्घुण हत्या करण्यात आली. त्यावेळी मारेकर्‍यांनी गुड्ड्याच्या शरीरावर 27 वार केल्याचे व त्याच्या हृदयाला व बरगळीला पिस्तुलातून झाडलेली गोळी लागल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुड्ड्याच्या मारेकर्‍यापर्यंत पोहचण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.
गुड्डया उर्फ रफियोद्दीन शफियोद्दीन शेख हा काल (दि.18) गोपाल टी हाऊस येथे सकाळी 6 वाजता चहा पिण्यासाठी आला होता. त्यावेळी इंडीगो कारमधून 9 जण आले.
कारमधील एकाने गुड्डयावर पिस्तुलातून गोळी झाडली. एक गोळी त्याच्या हृदयावर तर एक त्याच्या छातीच्या बरगळीजवळ लागल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

मारेकर्‍यांनी गुड्ड्याच्या मानेवर, पाठीवर, कमरेवर, गुप्तांगावर, हातावर व पोटावर असे 27 वार केल्याचेही तपासात पुढे आले आहे. तर एका मारेकर्‍याने गुड्ड्याच्या मानेवर 19 वेळा वार केल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रात दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गुड्डयाच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत आहे. गेल्या 24 तासात पोलिसांनी नेटवर्कच्या आधारे तपासाला गती दिली आहे.

शहरातील अनेक ठिकाणी पोलिसांनी झाडझडती घेण्याचे काम सुरु ठेवले आहे. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार केली आहेत. ही पथके पुणे, नासिक, जळगाव, अमळनेर आदी ठिकाणी काल जावून आली पण अद्याप पथकांच्या हाती काहीच लागलेले नाही.

गुड्ड्याच्या नातेवाईकांना दमदाटी
दोन.दिवसांपुर्वीच हत्या झालेल्या गुड्डयाच्या नातेवाईकांना आज दमदाटीचा प्रकार घडला. आज बुधवारी रात्री 10. 45 वाजेच्या सुमारास काही अनोळखी लोक गुड्डयाच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी गुड्डयाच्या नातेवाईकांना दमदाटी केली. यानंतर शहरात तणावाचे वातावरण पसरले.पोलीसांंना माहिती मिळताच शहरात शांततेचे आवाहन करण्यात आले. मात्र नागरींकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सुरू असलेल्या हाँटेल्स व लाँर्या बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान नागरीकांनी कोणत्याही.अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन
नागरिकांनी सोशल मिडीयावर काही आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ क्लिप व्हायळल होत आहे . तरी अशा क्लिप ग्रुपवर टाकणा-या व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना दयावी. तसेच काही समाजोपद्रवी व्यक्ती खोटया अफवा पसरवुन अशांतता निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये. शहरामध्ये शांतता असुन पोलीस तपास योग्यरित्या चालु आहे , असे आवाहन पोलिस अधीक्षक यांनी केले आहे. दरम्यान आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी 400 जणांविरूध्द पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*