न्या.संभाजी ठाकरे यांची धुळे जिल्हा न्यायाधीश पदावर बढती

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-येथील कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी दगडू ठाकरे यांची तदर्थ जिल्हा न्यायाधिश या पदावर बढती मिळाली असून त्यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे.

न्या. संभाजी ठाकरे हे वडती ता.चोपडा येथील रहिवाशी असून अवघे सहा महिन्याचे असतांना त्यांचे पितृछत्र हरपले. दोधवद ता.अमळनेर येथील मामांनी त्यांना आश्रय दिला.

मातोश्री द्रौपदाताईंनी कष्टाची कामे केली. बारावी नंतर पुणे येथील आय.एल्.एस. महाविद्यालयातून बी.एस.एल. एल.एल.बी. पदवी मिळविली नंतर धुळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून एल्. एल्. एम. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.

1999 साली लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधिश-कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग साठी निवड झाली. विविध ठिकाणी त्यांचे कामकाज पारदर्शी राहिले.

धुळे येथे कामगार न्यायालयात कार्यरत असतांना अनेक केसेसचा आणि गुंतागुंती प्रकरणाचा त्यांनी निपटारा केला. त्यांच्या सुविद्य पत्नी निवेदिता ठाकरे यांनीही विधी पदवी संपादन केली आहे.

 

LEAVE A REPLY

*