अखेर कुणाल बिअरबारवर हातोडा !

0
धुळे । दि.18 । प्रतिनिधी-शहरातील देवपूर परिसरात असलेल्या नकाणे रोडवरील सर्व्हे क्र. 65/2 मधील प्लॉट क्रमांक 9 ब/1 वरील कुणाल बिअरबारचे अतिक्रमण आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने जमिनदोस्त केले.
सदर दुकान बंद करण्यासाठी महिलांनी गेल्या दोन महिन्यापासून भजन आंदोलन सुरु केले होते. अखेर महिलांच्या आंदोलनाला यश आले आहे.
नकाणे रोडवरील कुणाल बिअरबार व प्रिन्स वॉईन शॉप बंद करण्यात यावे यासाठी नगरसेविका वैभवी दुसाणे, प्रतिभा चौधरी आणि नगरसेवक कमलेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले होते.

रोज दुकानासमोर भजन आंदोलन करण्यात येत होते. रस्ता रोको, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव या सारखे आंदोलन करण्यात आले होते.

सदर दुकान हटविण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. सदर दुकान अतिक्रमणात असल्याबाबत तक्रारही करण्यात आली होती.

महापालिका प्रशासनाने सदर दुकानाचे अतिक्रम काढून घेण्यासाठी कुणाल बिअरबार चालकला नोटीसही बजावली होती. परंतु अतिक्रमण काढले नाही म्हणून आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास महापालिकेसे अतिक्रमण निर्मुलन पथक फौजफाट्यासह कुणाल बिअरबार येथे हजर झाले.

यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेसीबीच्या सहाय्याने कुणाल बिअरबारचे अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमणधारक न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेवून महापालिकेने आधीच न्यायालयात कॅव्हेट देखल केला होता.

त्यामुळे नोटीसची मुदत संपताच आज हॉटेलवर हातोडा टाकला. अखेर महिलांच्या आंदोलनाला यश आले अतिकमिण काढण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*